चित्रपट सृष्टीमध्ये काम करताना प्रत्येक कलाकार त्याचा प्रत्येक सीन योग्य रीतीने देण्याचा प्रयत्न करतो. तो त्याची सगळी ताकद लावून मनापासून काम करत असतो. मग ते पात्र नायकाचं असो किंवा खलनायकाचं असो. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने काम करत असतो. अशा सर्व कलाकारांमध्ये सर्वात आघाडीचे नाव कुणाचे असेल तर ते म्हणजे बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. त्याने ‘3 इडिएट्स’, ‘ दंगल’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आमिर खान हा चित्रपटात प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन स्टोरी आणि नवीन संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. पात्र कोणतेही असो, तो खूप चांगल्या प्रकारे त्याचे पात्र निभावतो. म्हणून बॉलीवूडमधील सगळे त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट या नावाने आवाज देतात. त्याच्या ‘गुलाम’ या चित्रपटातील असाच एक किस्सा आहे. हा सीन देण्यासाठी आमिर खानने खूप प्रयत्न केले. जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती.
आमिर खानने ‘होली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. परंतु त्याच्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटाने त्याला सर्वत्र ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटाने तो अगदी रातोरात प्रसिद्ध झाला होता. आणि त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. कयामत से कयामत तक चित्रपट झाल्यानंतर आमिर खानने जवळपास आठ ते नऊ चित्रपट एकाच वेळी साईन केले होते.
यानंतर त्याने त्याच्या करिअरमध्ये खूप मेहनत घेतली आणि मेहनतीने त्याचे नाव कमावले. परंतू यातील गुलाम चित्रपटात काम करताना आमीरला खूप कष्ट घ्यावे लागले होते. या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट करताना आमिर खानने जवळपास १२ दिवस आंघोळ केली नव्हती. एका सीनमध्ये त्याला दुष्मनाला खूप मारायचे होते आणि तो सीन जवळ जवळ १२ दिवस शूट होत होता. या शूटिंगदरम्यान आमिर खानच्या चेहर्याला अनेक जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त देखील येत होते. त्याने त्याचा हाच चेहरा असाच राहण्यासाठी शूटिंग पूर्ण होईपर्यंत आंघोळ केली नव्हती. आंघोळ केली असेल तर त्याचा चेहरा पुन्हा पहिल्यासारखा करायला बराच वेळ गेला असता. म्हणून त्याने आंघोळ केली नव्हती.
या चित्रपटात त्याने सिद्धार्थ मराठे हे पात्र निभावले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत राणी मुखर्जी होती. या चित्रपटातील ट्रेनचा एका सीनची बॉलीवूडमध्ये खूपच चर्चेत आहे. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सगळीकडे याच्याबद्दल चर्चा झाली होती.
आमिर खानने दिल है कि मानता नही, अंदाज अपना अपना ,रंगीला, राजा हिंदुस्तानी, गुलाल, सरफरोष, लगान, दिल चाहता है, रंग दे बसंती, फना, तारे जमीन पर, गजनी, ३ इडियट्स, धुम ३, दंगल व सीक्रेट सुपरस्टारसारख्या चित्रपटात काम केले आहे .यातील त्याचा प्रत्येक चित्रपट हा सुपरहीट ठरला आहे. त्याच्या अभिनयाने त्याने प्रत्येकाच्या मनावर त्याची एक वेगळी छाप निर्माण केली आहे.










