बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयने चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ पूर्ण केला आहे. अनेक चित्रपटांमधून त्यांनी रसिकांची मने जिंकली. आता या अभिनेत्याने इंडस्ट्रीतील त्याच्या चित्रपटांच्या निवडीबद्दल आणि फीबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. त्याने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त इतर भाषेतील चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असून त्याबद्दल ताे सविस्तर पणे बाेलला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल बोलताना अभिनेता विवेक ओबेरॉय (vivek oberoi) म्हणाला की, ‘मी ठरवले आहे की, मला प्रत्येक दक्षिण भारतीय भाषेत चित्रपट करायचे आहेत, जरी मी हिंदी चित्रपटसृष्टीत जितके शुल्क आकारू शकलो ते कुठेही आकारू शकलाे नसलाे, तरी मी माझी फी कमी करण्यासही तयार आहे.’
कमी फी घेण्याबाबत बोलताना विवेक म्हणाला की, ‘पैशासाठी काम करणाऱ्या आणि बेजबाबदारपणे चित्रपट निवडणाऱ्या लोकांना तो आधीपासूनच ओळखतो, पण मी यापासून दूर आहे. आज मी जिथे उभा आहे, मला माहित आहे की, पैशांमुळे मी चित्रपट निवडत नाही, त्यामुळे चित्रपट निवडताना मी खूप काळजी घेतो.’
View this post on Instagram
रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या चित्रपटात दिसणार विवेक ओबेराॅय
विवेक ओबेरॉयच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्राही आहेत. मात्र, या चित्रपटात सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (bollywood actress vivek oberoi talks about his regional projects actor reveals he takes a pay cut to do films down south )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिपुरुष’च्या ट्रेलर लाँचवेळी भावूक झाली क्रिती सेनाॅन; म्हणाली, ‘काही चुका झाल्या असतील, तर…’
फ्रेंच, ब्रिटिश-अमेरिकन भाषेत अशाप्रकारे बाेलली श्रद्धा कपूर, व्हिडिओ पाहून चाहते थक्क