Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

इलियाना डिक्रूझने पहिल्यांदा दाखवला बेबी बंप, पण युजर्सने चाैकशी केली बाळाच्या वडिलांची

चित्रपट अभिनेत्री इलियाना डिक्रूझ आई होणार आहे. अशात आता तिने तिच्या बेबी बंपचा पहिला फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. खरे तर, अभिनेत्रीने एप्रिलमध्ये आई होण्याची घोषणा केली होती. अशात इलियानाने थाई हाय स्लिट स्लीव्हलेस ब्लॅक गाऊन घातला आहे, ज्यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे. अभिनेच्या चेहऱ्यावर हास्य असून तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंन्सी ग्लो स्पष्टपणे दिसत आहे.

इलियाना डिक्रूज (ileana dcruz) हिने पहिल्यांदाच तिचा फोटो शेअर करून प्रेग्नसीची माहिती दिली आहे. मात्र, याशिवाय अन्य कोणतीही माहिती तिने दिलेली नाही. इलियाना डिक्रूजने अनेक फोटो शेअर केले आहेत, जे तिच्या घरातील फोटो आहेत. यामध्ये ती नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. पहिला फोटो शेअर करताना इलियानाने लिहिले की, “बंप अलर्ट.” याशिवाय तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

इलियाना डिक्रूझच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत, ज्यात अथिया शेट्टी, सोफी चौधरी आणि शिवानी दांडेकर यांसारख्या लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, याआधी ही बातमी आली होती की, इलियाना डिक्रूज कॅटरिना कैफचा भाऊ सेमेस्टर मिशेलला डेट करत आहे. मात्र, दोघांनीही या वृत्तांना दुजोराही दिला नाही आणि नाकारलंही नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

इलियाना डिक्रूज नुकतीच बादशाहसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. अभिनेत्रीच्या आगामी प्राेजेक्टसबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ‘अनफेअर अँड लव्हली’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याशिवाय रणदीप हुड्डाही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. इलियाना डिक्रूझने अद्याप मुलाच्या वडिलांचा खुलासा केलेला नाही, तसेच ती विवाहित आहे की, नाही याचीही माहिती दिलेली नाही.(bollywood actress ileana dcruz flaunts baby bump for the first time announces pregnancy without marriage photos goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भाईजानसह ‘हे’ प्रसिद्ध कलाकार कोलकात्यातील कॉन्सर्टमध्ये ठाेकणार धूम, ‘इतक्या’ लाखात मिळणार तिकिट

रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा