Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलमानने ‘या’ कारणास्त ममता बॅनर्जींची घेतली भेट, मुख्यमंत्री ट्विट करत म्हणाल्या, ‘कला, समाज अन्…’

सुपरस्टार सलमान खान याने शनिवारी (दि. 14 मे)ला कोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी हजेरी लावली. मात्र, या कॉन्सर्टपूर्वी भाईजानने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. अशात त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अभिनेता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर दिसत होते.

सलमान खानसोबतचे फोटो पोस्ट करताना ममता बॅनर्जी यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्यामध्ये काय बातचीत झाली हे सांगितले. त्या म्हणाल्या, “आज माझ्या निवासस्थानी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान जी आले, त्यांना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून मला खूप आनंद झाला. आमच्यात सिनेविश्वापासून ते कला, समाज आणि लोकांच्या विकासापर्यंतच्या विषयांवर चर्चा झाली. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या संमेलनासाठी वेळ काढल्याबद्दल मी त्यांचे विनम्र आभार व्यक्त करते. ते उत्तम आरोग्यासह यशाच्या पायऱ्या चढत राहो हीच सदिच्छा. मी त्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते.”

समाेर आलेल्या व्हिडिओमध्ये, सलमान खान ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर कारमधून खाली उतरताना दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अभिनेत्याचे शाल पांघरून स्वागत केले. यावेळी सलमान आणि सीएम ममता बॅनर्जी यांंचे एकत्र पॅपराझींने फाेटाे क्लिक केले.

सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसला हाेता. मात्र, हा चित्रपट विशेष प्रेक्षकांना आवडला नाही. अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही. अशात सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत कॅटरिना कॅफ देखील मुख्य भूमिकेत आहे. ( bollywood actor salman khan meets west bengal cm mamata banerjee at her residence in kolkata video viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Mother’s Day 2023 | सिने जगतातील ‘या’ अभिनेत्री परंपरेला छेद देत, नावापुढे लावतात आईचे आडनाव
नेते राघव चढ्ढा परिणीतीच्या नखरेल अदांवर झाले घायळ, भर साेहळ्यात अभिनेत्रीला केले किस

हे देखील वाचा