या जगात नेहमीच आई आणि मुलीचे नाते हटके असते. या नात्यात सदैव अपार अपार आणि अपार प्रेमच मिळते. देवानंतर कोण तर आई असे सगळीकडेच मानले जाते. आईला तिच्या बाळाबद्दल किती आणि कसे प्रेम आहे, हे ती स्वतः देखील सांगू शकत नाही. नुकताच मदर्स डे झाला. आपल्या आईबद्दल भावना या दिवशी सर्वानी व्यक्त केल्या. याला कलाकार आणि सामान्य माणूस देखील अपवाद नव्हते.
आपण मनोरंजनविश्वात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेक कलाकारांनी त्यांची मुलं दत्तक घेतली आहे. तर काहींनी खासकरून मुलींना दत्तक घेतले आहे. यामागची प्रत्येकाची कारणं कोणतेही असली तरी दत्तक घेणे हे तसे काही विशेष राहिलेले नाही. एका अनाथ बाळाला या जगात त्याचे हक्काचे घर आणि आनंद मिळत या दत्तक घेण्याने मिळतो. बॉलिवूडमध्ये अनेकांनी जरी त्यांची मुलं दत्तक घेतली असली, तरी साऊथ इंडस्ट्रीमध्ये असे फारच कमी ऐकू येते.
View this post on Instagram
अशातच आता एका कन्नड अभिनेत्रीने एका मुलीला दत्तक घेतले आहे. कन्नड अभिनेत्री अभिरामी ही साऊथ इंडस्ट्रीमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला अमाप फॅन फॉलवोइंग देखील आहे. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणाऱ्या अभिरामीने एक खास पोस्ट शेअर केली असून, यामुळे ती खूपच चर्चेत आली आहे. अभिरामीने तिच्यापोस्टमध्ये ती आई झाल्याचे सांगत तिने एका मुलीला दत्तक घेतल्याचे जाहीर केले आहे.
अभिरामीने तिचा आनंद जाहीर करत केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “आम्ही आता एका मुलीचे आईबाबा झाले आहोत. मला आणि राहुलला हे सांगताना खूप आनंद होत आहे. की आम्ही मागील वर्षी एका मुलीला दत्तक आहे. आमच्या मुलीचे नाव कल्की आहे. आमच्यासाठी हा पालकत्वाचा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरत आहे. आम्हाला ही नवी भूमिका उत्तमप्रकारे बजावण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत.” यासोबतच तिने तिच्या मुलीसोबतचे अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. या ओस्टनंतर अभिरामीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुःखद! लोकप्रिय गायिकेची आत्महत्या, हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या आढळला मृतदेह










