Wednesday, December 25, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुंबईतील वांद्रे येथे सलमान खान बांधणार 19मजली हॉटेल, ‘या’ सुविधांनी सुसज्ज असेल इमारत

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, आता अभिनेता चित्रपटामुळे नाही, तर अन्य कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. खरे तर, सलमान खान आणि त्याचे कुटुंब मुंबईत एक हॉटेल बांधणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिनेत्याचे हे हॉटेल 19 मजल्यांचे असेल, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असतील.

माध्यमातील वृत्तानुसार, सलमान खानचे कुटुंब कार्टर रोड, वांद्रे येथील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. बीएमसीने इमारतीच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हे 19 मजली हॉटेल असणार आहे. या प्लॉटमध्ये पूर्वी स्टारलेट कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी होती, जिथे खान कुटुंबाचे अपार्टमेंट होते. सुरुवातीला या मालमत्तेवर गृहनिर्माण संस्था बांधण्याचे नियोजन होते. मात्र, नंतर त्यात बदल करण्यात आला.

सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाच्या या 19 मजली हॉटेलची उंची 69.9 मीटर असेल. बीएसीकडे सादर केलेल्या प्रस्तावात या इमारतीत पहिल्या मजल्यावर कॅफे आणि रेस्टॉरंट बांधण्याची योजना आहे, तर तिसऱ्या मजल्यावर जिम आणि स्विमिंग पूल बांधण्यात येणार आहे. चौथा मजला सर्व्हिस फ्लोअर म्हणून वापरला जाईल. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कन्व्हेन्शन सेंटर्स असतील, तर सातव्या मजल्यापासून 19व्या मजल्यापर्यंत हॉटेलच्या सर्व खोल्या असतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा ‘किसी ना भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये दिसला होता. मात्र, त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही चांगली कामगिरी करु शकला नाही. अशात सलमान खान लवकरच ‘टायगर 3’ मध्ये त्याचा अॅक्शन अवतार दाखवताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्क्रिन शेअर करणार आहे. (bollywood actor salman khan along with his family is planning to build a plush hotel in mumbai )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मागील पानावरून पुढे! मराठीमधील ‘या’ लोकप्रिय कलाकारांच्या त्रिकुटाची तब्बल ४ दशकांनी एकत्र भेट, व्हिडिओ झाला व्हायरल
‘द केरला स्टाेरी’वरून पुण्यातील FTIIमध्ये राडा, माेठ्या पाेलीस फौजफाट्यासह चित्रपटाचं स्क्रीनिंग

हे देखील वाचा