आतापर्यंत छोट्या पडद्यावर अनेक काॅमेडी शो प्रसारित झाले आहेत. पण ‘द कपिल शर्मा शो’ ने चाहत्याच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केल आहे. असंख्य चाहते कपिल शर्माच्या विनोदीबुध्दीच तोंडभरुन नेहमीच कौतुक करत असतात. ‘द कपिल शर्मा शो’मुळे विनोदवीर कपिल शर्मा याला झगमगत्या विश्वात ओळख मिळाली आहे. हा शो नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. मात्र आता ‘द कपिल शर्मा शो’ च्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
‘द कपिल शर्मा शो’ हा शो लवकरच ऑफ एअर अर्थात बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता लवकरच कॉमेडियन कपिल शर्मा विदेश दौरा करणार आहेत. कपिल शर्मा आता परदेशात परफॉर्म करणार आहे. ज्यासाठी तो जुलैपासून ६ शहरांमध्ये प्रेक्षकांना सतत हसवणार आहे. कपिल शर्मा लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहे. तो न्यू जर्सीच्या 6 शहरांमध्ये परफॉर्मन्स करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहे.

कपिल गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना पोट धरुन हसवण्याच काम करत आहे. प्रेक्षकांचा ‘द कपिल शर्मा शो’ पाहिल्यानंतर दिवसभरात आलेला तणाव कमी होतो. ‘द कपिल शर्मा शो’ कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. पण यामध्ये वाईट बातमी अशी आहे की ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा काही काळ बंद होऊ शकतो. या शो चे लाखो चाहते आहेत. . त्यामुळे तुम्ही देखील या शो चे चाहते असाल तर तुम्हाला देखील निराश कराणारी ही बातमी आहे.
कपिल शर्मा त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्रचंड उत्सुक आहे. १५ जुलै रोजी तो न्यू जर्सी येथे परफॉर्म करणार आहे. माध्यमांशी संवाद साधताना सॅम सिंग म्हणाले, ‘चांगल्या गोष्टी नेहमी काही चांगल्या कारणांनी घडतात. आम्हाला गेल्या वर्षी व्हिसा मंजूर झाला, परंतु भेटींना उशीर झाल्यामुळे आम्हाला यूएस दूतावासाकडून व्हिसा स्टॅम्पिंग तारखा मिळू शकल्या नाहीत. या वर्षी आमच्या व्हिसाच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही या शोसाठी सज्ज झालो आहोत.
कॉमेडियन कपिल शर्मा यशाच्या पायऱ्या चढत आहे. कॉमेडीपासून करिअरची सुरुवात करण्यापासून ते अभिनय आणि गाण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच सुंदर आहे. ८ जुलै २०२३ रोजी कपिल शर्मा आणि त्यांची टीम न्यू जर्सीला रवाना होणार आहे. त्यामुळे हा शो बंद होणार असल्याच्या चर्चेला जोर धरला आहे. याआधीही शोमध्ये हंगामी ब्रेक घेण्यात आला होता. हा ब्रेक २०२१ आणि २०२२ मध्ये घेण्यात आला होता.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’










