‘बिग बॉस’ फेम अभिनेता शालिन भानोटबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शालिन भानोतला प्रेक्षकांनी बिग बॉसमध्ये चांगलीच पसंती दिली होती. अभिनेता शालिनने निर्मात्यांना टीआरपी मिळविण्यात मोठी मदत केली. या शोमध्ये त्यांच्या प्रेमकथेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, ही गोष्टही शो सोबतच संपुष्टात आली.
‘बिग बॉस १६’चा हा सीझन रोमान्ससाठी प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील. या घरात अनेक जोडपी बनली होती. दरम्यान, टिनाचे नाव बिग बॉस १६चे स्पर्धक गौतम विग यांच्याशी जोडले गेले, परंतु कधीही पुष्टी झाली नाही. त्यापैकी एक शालिन भानोत आणि टिना दत्ता यांचा होता. मात्र, त्यांचा रोमान्सही शो संपण्यापूर्वीच संपला. आता दोघे वेगळे झाले आहेत आणि शालिन म्हणते की, तो सिंगल नाही.
शालिनच्या आयुष्यात प्रेमाची एंंट्री झाली आहे. या बद्दल त्याने स्वत: खुलासा केला आहे. ते ऐकून चाहत्यांनाही आश्चर्य वाटेल. त्याने सांगितले की, तो कोणाला तरी डेट करत आहे. पण त्याला त्या मुलीचे नाव सांगायचे नाही. अशा परिस्थितीत त्याच्या प्रेयसीचे नाव जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. आता शालिन हे गुपित कधी उघड करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बिग बॉसमधून लोकप्रियता मिळवल्यानंतर शालिन सध्या एकता कपूरच्या बेकाबू या नाटकात राणवची मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत शालिनसोबत ईशा सिंग आणि मोनालिसा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, एक काळ असा होता की शालिन भानोत आणि टीना दत्ता हे त्यांच्या मैत्रीमुळे आणि नंतर प्रेमकथेमुळे चर्चेत आले होते. दोघेही शोमध्ये एकमेकांसाठी स्वयंपाक करताना तर कधी डान्स करताना दिसले. दोघांनीही आय लव्ह यू म्हटलं होतं. पण शोमध्ये शालिन भानोत आणि टिना दत्ता यांच्यात एकदा भांडण झालं.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रसिद्ध अभिनेत्याचा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी मृत्यू, घराच्या बाथरूममध्ये सापडला मृतदेह
विवाहित असतानाही रसिका अन् सुयाेगने केला ‘ताे’ किस सीन; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला…’