Monday, January 26, 2026
Home भोजपूरी मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शकाचे निधन, हॉटेल रूममध्ये आढळले मृतस्वस्थेत

मनोरंजनविश्वातील ‘या’ लोकप्रिय दिग्दर्शकाचे निधन, हॉटेल रूममध्ये आढळले मृतस्वस्थेत

मागील काही दिवसांपासून सतत मनोरंजनविश्वातून वाईट बातम्या समोर येत आहे. आता भोजपुरी इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भोजपुरी चित्रपटांचे निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या सुभाष चंद्र तिवारी यांचा मृतदेह आढळला आहे. सोनभद्र शहरातील एका हॉटेलमध्ये संदिग्ध अवस्थतेत ते मृतावस्थेत आढळले आहे. सुभाष यांच्या निधनामुळे हॉटेलमध्ये आणि भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच हॉटेलकडून पोलिसांना कळवण्यात आले होते.

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सर्व पाहणी करून सांगितले, “सुभाष हे वाराणसीच्या मूळ रहिवासी होते. ते त्यांच्या आगामी ‘दो दिल बंधे एक डोरी से’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी आपल्या ४० लोकांच्या टीमसह ११ मे पासून या हॉटेलमध्ये थांबले होते. २३ मे रोजी शूटिंग संपल्यानंतर त्यांना छातीत दुखायला लागल्यामुळे एका हॉस्पिटलमध्ये नेले गेले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना सोडले गेले होते.

२३ मे ला त्यांनी पुन्हा शूटिंग सुरु केली. शूटिंग संपल्यानंतर रात्री रूममध्ये सुभाष आले. २४ मे ला सकाळी १० पर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेलकडून पोलिसाना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिल्यावर सुभाष मृतावस्थेत होते. दरम्यान पोलिसांनी सुभाष यांची बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली असून, त्याचे रिपोर्ट आल्यानंतर मगच मृत्यूच्या कारणाचा उलगडा होणार आहे. तत्पूर्वी सुभाष यांच्या अशा अचानक निधनामुळे भोजपुरी इंडस्ट्रीमधून दुःख व्यक्त केले जात आहे.

हे देखील वाचा