कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे आजकाल सगळीकडे लॉकडाऊन आहे, त्यामुळे सगळेजण घरातच बसून आहेत. यासोबत अनेक कलाकार देखील घरीच आहे. तरी हे सगळे घर बसल्या का होईना पण सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. यात समावेश होतो बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टर याचा. ईशान नेहमीच त्याच्या आई सोबत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. असाच ईशानचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याची आई नीलिमा सोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका चॉकलेट वरून त्यांच्यात वाद होताना दिसत आहे. अत्यंत मजेशीर अंदाजात त्यांनी हा व्हिडिओ केला आहे.
या मजेशीर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नीलिमा अजीम ईशानला म्हणते की, “तू माझे चॉकलेट बाहेर का ठेवले?? हे असं करणारा तू आहेस तरी कोण ?? मला माझे चॉकलेट पाहिजे. माझं काही आयुष्य नाहीये. तू फक्त माझा लहान मुलगा आहे. मला योगा करायच्या आधी माझं चॉकलेट पाहिजे.”
यानंतर ईशानने कॅमेरा त्याच्याकडे फिरवला आणि बोलला. “तू दिवसभरात सारखं चॉकलेट खात असते आणि ही गोष्ट मला एका अाठवड्यानंतर समजली आहे. आणि आता तूच मला ओरडत आहे.” अश्या प्रकारे तो त्याच्या आईला चॉकलेट द्यायला नकार देतो. यावर त्याची आई म्हणते की, “ठीक आहे, मग मी आता योगा करणार नाही.”
ईशान आणि त्याच्या आईचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.सगळ्यांना त्यांचा हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. कमेंट करून सगळे प्रेक्षक त्यांच्या या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. चाहत्यांसोबतच नीलिमाची सून म्हणजेच शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हीने देखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. या व्हिडिओवर कमेंट करत मीराने लिहिले आहे की, “हाहाहा तू कोण आहेस ?” तसेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या आहे.