Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड गाणं गाणे अनन्या पांडेला पडलं भलतंच महागात, छोट्या बहीणीने सर्वांसमोर केली अशी हटाई

गाणं गाणे अनन्या पांडेला पडलं भलतंच महागात, छोट्या बहीणीने सर्वांसमोर केली अशी हटाई

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे या दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसते. तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक घटना, फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. नुकताच तिचा एक फोटो सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला तिच्या लहानपणीचा एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर आहे दिसत आहे, तिचा हा फोटो बघून प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण आठवले.

अनन्याला अभिनया व्यतिरिक्त गायनाची देखील खूप आवड आहे. परंतु तिचा हा छंद बाकी लोकांसाठी खूपच भारी पडतो. तिचे गाणे ऐकून इतरांच्या कानातून रक्त येऊ लागते, हे आम्ही नाही तर स्वतः अनन्याची बहीण रायसा हिने म्हटले आहे.

अनन्याने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका चॅटचा स्क्रीनशॉर्ट देखील शेअर केला आहे. या मध्ये तिच्या बहिणीने तिला मेसेज केला आहे की, तुझे गाणे बंद कर, आता माझ्या कानातून रक्त येऊ लागले आहे.

या मेसेजवर अनन्याने अत्यंत मजेशीर अंदाजात तिच्या बहिणीला उत्तर दिले आहे. ती म्हणते की, “तुझ्या सोबत चॅटिंग करायला मला खूपच आवडते.” तिच्या इंस्टा स्टोरीचा हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना समजले आहे की, अनन्या खूपच वाईट गाणे गाते.

Photo Courtesy: Instagram/ananyapanday

याआधी तिने सुहाना आणि शनाया सोबतचा एक थ्रो बॅक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्या तिघीही होळी खेळताना दिसत होत्या. यासोबत तिने लिहिले होते की, ती तिची होळी तिच्या या दोन मैत्रीणींसोबत खेळत असते. आणि आता या होळीला ती त्या दोघीनांही खूप मिस करत आहे.

अनन्या पांडेने ‘स्टूडंट ऑफ द इअर टू’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती याआधी ईशान खट्टर सोबत ‘खाली पिली’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील तिचा टपोरी अंदाज सगळ्यांना खूपच आवडला होता.

हे देखील वाचा