Thursday, December 5, 2024
Home हॉलीवूड खळबळजनक! पाच महिन्यांपासून गायब असलेल्या अभिनेत्याचे सापडले अवशेष? वाचा सविस्तर

खळबळजनक! पाच महिन्यांपासून गायब असलेल्या अभिनेत्याचे सापडले अवशेष? वाचा सविस्तर

हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाच महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता ज्युलियन सँड्सबद्दल एक वाईट बातमी समोर आली हाेती. खरे तर, ‘अ रुम विथ अ व्यू’ सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता ज्युलियन सँड्स दक्षिण कॅलिफोर्नियाच्या पर्वतांमध्ये बेपत्ता झाला होता. अशात अभिनेत्याबद्दल सतत शोध घेऊनही काहीही सापडले नाही आणि घटनेला पाच महिने उलटून गेले. यादरम्यान, ज्युलियनच्या कुटुंबासह त्याचे चाहते देखील अभिनेत्याच्या बेपत्ता झाल्याबद्दल अपडेटची वाट पाहत हाेते. आता अशी बातमी समोर आली आहे, जी सर्वांना दु:खी करणारी आहे. खरं तर, ज्युलियन ज्या ठिकाणाहून बेपत्ता झाला हाेता, त्या ठिकाणी मानवी अवशेष सापडले आहेत.

माध्यमातील वृत्तानुसार, दक्षिण कॅलिफोर्निया परिसरात मानवी अवशेष सापडले आहेत आणि हे तेच क्षेत्र आहे, जेथे पाच महिन्यांपूर्वी ब्रिटिश अभिनेता ज्युलियन सँड्स बेपत्ता झाला होता. अशात सॅन बर्नार्डिनो काउंटी शेरिफ विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, “शनिवारी सकाळी 10च्या सुमारास कॅलिफोर्नियातील एका हायकरने त्यांच्याशी संपर्क साधला, ज्याला लॉस एंजेलिसच्या ईशान्येस 40 मैलांवर असलेल्या माउंट बाल्डी जंगलामध्ये मानवी अवशेष सापडले.” विभागाचे म्हणणे आहे की, “सापडलेले अवशेष ओळखण्यासाठी कोरोनर कार्यालयात नेण्यात आले आहेत. अशात या ओळख प्रक्रियेस अंदाजे एक आठवडा लागू शकतो.”

विशेष म्हणजे, 65 वर्षीय अभिनेत्याच्या पत्नीने 13 जानेवारी रोजी सॅन गेब्रियल माउंटनच्या बाल्डी बाउल परिसरात हायकिंग करत असताना ज्युलियन बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युलियन अमेरिकन माउंटन रेंजमध्ये हायकिंग करत होता. अशात ही बाब कळताच अभिनेत्याला ताबडताेब शाेधण्याचे काम सुरु झाले.

ज्युलियन सँड्सच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, अभिनेत्याने केवळ चित्रपटातच नाही, तर टीव्हीवरही काम केले आहे. इंग्लंडमध्ये जन्मलेले, ज्युलियन सँड्सने 1985मध्ये आलेल्या ‘ए रूम विथ अ व्ह्यू’ या चित्रपटाच्या यशानंतर हॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी 1980मध्ये कॅलिफोर्निया येथे प्रवेश केला. यानंतर या अभिनेत्याने 1989 च्या ‘वॉरलॉक’, 1990 च्या ‘अरॅकनोफोबिया’, 1991 च्या ‘नेकेड लंच’, 1993च्या ‘बॉक्सिंग हेलेना’ आणि 1995 च्या ‘लीव्हिंग लास वेगास’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून लोकांची मने जिंकली.(hollywood actor julian sands human remains found in area where a room with a view actor disappeared five months ago)

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा