Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अनेक पाकिस्तानी महिलांचे पती भारतीय…’, सीमा हैदरला पाठिंबा देत प्रसिद्ध कलाकाराचे खळबळजनक भाष्य

सध्या देशभरात चर्चेत असणारा विषय म्हणजे सीमा हैदर आणि सचिन मीना यांचा. प्रेमासाठी मुलाबाळांसोबत पाकिस्तान सोडून भारतात येणाऱ्या सीमामुळे एकच खळबळ माजली आहे. सीमा आणि सचिनची मैत्री, प्रेम आणि लग्नाच्या बातम्यांनी सध्या जोर धरला आहे. अशातच पाकिस्तानी अभिनेता हुमायूं सईद याने मोठे भाष्य केले आहे. चर्चेविषयी बोलताना म्हणाला आहे की, हा सर्व मूर्खपणा आहे. सीमारेषेपलीकडील प्रेम आणि लग्नाविषयी तो म्हणाला की, हे सर्व होत असते. ही कोणतीही मोठी गोष्ट नाही.

अभिनेता हुमायूं सईद (Humayun Saeed) याने एबीपी लाईव्ह डॉट कॉमशी संवाद साधला. यावेळी त्याने म्हटले की, “भारतात माझे खूप चांगले मित्र आहेत. त्यांना प्रेम झाले आणि त्यांनी लग्नही केले. त्यांची पत्नी पाकिस्तानी आहे. पाकिस्तानमध्ये अशा अनेक महिला आहेत, ज्यांचे पती भारतीय आहेत. अनेक लोक आहेत, ज्यांचे नातेवाईक भारतात आहेत. हे सर्व होत असते.”

त्याने असेही म्हटले की, तो कराचीत जन्मला आहे, पण त्याच्या वडिलांचे भारताशी खूप खास नाते आहे. त्याच्या वडिलांचा जन्म इंदोरमध्ये झाला आहे. त्याने म्हटले की, “सोशल मीडियाचा काळ आहे. कोणत्याही बातमीला कोणताही रंग दिला जाऊ शकतो. कुणीही चुकीचे वक्तव्य केले, तर ते उचलून धरले जाते. जे चुकीचे वक्तव्य आहे, ते जास्त दूर जाते. जे सकारात्मक असते, ती गोष्ट दबून जाते. मी हेच म्हणेल की, हा सर्व मूर्खपणा आहे.”

त्याने यावेळी भारत-पाकिस्तानमध्ये अभिनेत्यांवरील बंदीविषयीदेखील भाष्य केले. तो म्हणाला की, दोन्ही देशांचे कलाकार एकसोबत काम करू इच्छितात. मात्र, राजकीय कारणांमुळे अशी परिस्थिती ओढवली आहे. त्याच्या मते, काम जरी एकत्र करता आले नाही, पण लोकांचे एकमेकांना भेटणे बंद झाले नाही पाहिजे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Humayun Saeed (@saeedhumayun)

तो म्हणाला की, “इथे कार्यक्रम होत असेल, तर सलमान, शाहरुख, अक्षयने यावं, आदर मिळावा. मी तिथे गेलो, तर आदर मिळावा. जर सोबत काम करणे शक्य नाहीये, तर काही हरकत नाही. मात्र, एकमेकांना भेटणे रोखले नाही पाहिजे. आम्ही एकमेकांच्या कामाची प्रशंसा करू शकणे, हे गरजेचे आहे.”

हुमायूंविषयी बोलायचं झालं, तर तो सध्या ‘मेरे पास तुम हो’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. यामध्ये त्याने दानिश अख्तरचे पात्र साकारले आहे. ही मालिका पाकिस्तानमध्ये चांगली गाजली आहे. आता ही मालिका भारतात जिंदगी चॅनेलवर 2 ऑगस्टपासून टेलिकास्ट होणार आहे. (seema haider sachin meena case pakistani actor humayun saeed reaction read here)

महत्त्वाच्या बातम्या-
इकडे रणवीर शर्टलेस झाला अन् तिकडे दीपिकाच्या कमेंटने लुटली वाहवा, दोघांनी वाढवले इंटरनेटचे तापमान
फक्त ‘या’ कारणासाठी शर्लिनसोबत नात्यात होता राजकारण्याचा मुलगा, भेटवस्तू देऊन अभिनेत्रीशी…

हे देखील वाचा