टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या 12 वर्षापासून मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेने दर्शकांना आपलेसे केले आहे. यातील नेहमीच प्रत्येकाच्या ओठावर नाव असलेलं पात्र दया बेन म्हणजे दिशा वकानी. पडद्यावर ती दिसता क्षणीच तिचे चाहते खुश होत असतात. दया बेनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री दिशा वकानीने तिचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती वेगळ्याच आणि मॉर्डन अवतारात दिसत आहे. हा व्हिडिओ दर्शकांना खूपच आवडत आहे. खरंतर हा व्हिडिओ एका फेस एॅपद्वारे एडिट केला आहे . यामध्ये दिशा हॉलीवूड चित्रपटातील फिक्शनल कॅरेक्टर हार्ली क्वीन हिच्या वेशात दिसत आहे. अत्यंत स्टायलिश आणि मॉडर्न अंदाजात दिशाला बघून तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिला या रुपात तिच्या वैयक्तिक आयुष्यात बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
https://www.instagram.com/p/CNuBB5eh6qk/?utm_source=ig_embed
दिशा वकानीने 2017 मद्ये तारका मेहता का उलटा चश्मा या मालिकेतून मॅटरनिटी लिव्ह घेतली होती. पण ती अद्यापही हा मालिकेमध्ये परत आली नाहीये. तिचे चाहते तिला परत या शोमध्ये बघण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. पण मागील काही दिवसापासून दिशा या शोमद्ये परत येणार नाही अशी चर्चा चालू आहे. तिला तिच्या मनाप्रमाणे पगार आणि शूटिंगचा टाईम मिळत नसल्याने ती ही मालिका सोडणार आहे, अशी माहिती समोर आली होती. पण मालिकेच्या निर्मात्यांनी अशी कोणतीच अधिकृत घोषणा अजुन तरी केली नाहीये. तसेच या मालिकेत दिशाच्या जागी अनेक अभिनेत्रींची नावे देखील समोर आली होती. पण प्रेक्षक दया बेनच्या जागेवर दिशा सोडून इतर कोणालाही बघण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.