Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

“मुख्यमंत्री व्हायची संधी मिळाली तर?”, प्रिया बापटच्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली…

अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकामुळे चांगलीच चर्चेत आहे. या नाटकात
प्रिया बापट व उमेश कामत या नवराबायकोची जोडी एकत्र दिसणार आहे. प्रिया बापटने यापूर्वी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजमध्ये दिसली होती. या सिरीजमध्ये ‘पूर्णिमा गायकवाड’ एका राजकारणी महिलेची भूमिका केली होती. या भूमिकेबदल माध्यमांशी बोलताना प्रियाने असं उत्तर दिलं आहे ज्याच सगळ्यांनीचं कौतुक केले आहे.

‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या पर्वात पूर्णिमा गायकवाड हे पात्र महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आहे. त्याच
संदर्भात प्रियाला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. जर तुला खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री किंवा तत्सम मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली तर सर्वसामान्यांसाठी तू सर्वात आधी काय करशील?”

या प्रश्नाचे उत्तर देत प्रिया म्हणाली की, “महिला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. तर मी सगळ्यात आधी मुंबईचे रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न करेन. रस्ते हे मुंबईकरांसाठी सर्वात जास्त गरजेचे आहेत. त्यामुळे इतर काही करण्यापेक्षा रस्त्यांमध्ये सुधारणा करेन. महत्त्वाच्या कामाच्या ठिकाणी जाताना अनेकदा रस्त्यांमुळे समस्या उद्भवतात. त्यामुळे मला लोकांचा प्रवास सुखकर करायला नक्कीच आवडेल,” असे प्रिया म्हणाली. प्रियाच्या या उत्तराने चाहते खुश‌ झाले आहेत.

दरम्यान, प्रिया बापट (priya bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 5 ऑगस्टला संपन्न झाला असून लोकांनी या प्रयोगाला चांगला प्रतिसाद दिला आहे. या नाटकात प्रिया-उमेशसह पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.(priya bapat told if she got chance to be the chief minister says firstly i will work for mumbai roads)

हेही वाचा-
मैत्रीदिनी मित्राला भन्नाट डायलॉग मारायचाय?, तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी, वाचा 31 डायलॉग एकाच क्लिकवर
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांची मैत्री आहे सर्वात खास

हे देखील वाचा