सध्या सोशल मीडियावर जवळपास सर्वच कलाकार आपल्या व्हिडिओ आणि फोटोंनी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यामध्ये हॉट अभिनेत्री सनी लिओनीचाही समावेश होतो. सनी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. सनी लिओनीने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये ती यारियां चित्रपटातील गाण्यावर नाचताना दिसली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर खास कॅप्शन लिहिले आहे. या पोस्टला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारही अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट करत आहेत.
या व्हिडिओमध्ये ती नेहमीसारखीच खूपच सुंदर दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. काहीतरी हटके करून दाखवत ती आधी इंग्रजी गाण्यावर नाचताना दिसली, पण नंतर अचानक ती ‘आज ब्लू है पानी-पानी’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसली. या व्हिडिओसमवेत असलेल्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘तुम्हाला कोणत्या गाण्यावर सर्वात जास्त नृत्य करायला आवडते, तेही वेड्यासारखे?’ सनी लिओनीने यामध्ये एमटीव्हीला टॅग केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
सनी लिओनी बऱ्याचदा आपल्या मुलांसोबत कॅमेऱ्यामध्येे कैद झालेली दिसली आहे. सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आता ‘शेरो’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ती जखमी असल्याचे दिसून येते. या चित्रपटाचा टिझर २५ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मानसशास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे. सनीचा हा चित्रपट ४ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तारका मेहता फेम दया बेनने केली हॉलीवूडमध्ये एंट्री, चाहते झाले भलतेच खुश