Thursday, August 7, 2025
Home मराठी स्त्री- पुरुषातील भेद संपवत मराठमोळ्या अभिनेत्याने धोतर म्हणून नेसली साडी, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

स्त्री- पुरुषातील भेद संपवत मराठमोळ्या अभिनेत्याने धोतर म्हणून नेसली साडी, कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकाराची वेगळी स्टाईल आपल्याला पाहायला मिळते. नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न ते करत असतात. कधी आपल्या महागड्या गाडी- बंगल्यांमुळे, तर कधी आपल्या चित्रपटांमुळे ते चर्चेत असतात. त्यांचा फॅशन सेन्सही तितकाच कमालीचा असतो. कधी ते पारंपारिक अंदाजात दिसतात, तर कधी पाश्चात्य. फॅशन सेन्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर मराठी कलाकारही मागे नाहीत. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक घरात पोहोचलेला अभिनेता अभिजीत खांडकेकरही आता आपल्या फॅशनमुळे चर्चेत आला आहे. अभिजीतने पारंपारिक पोशाखातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातही त्याचे कॅप्शनने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

अभिजीतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने स्त्री- पुरुषांतील भेद संपवत निळ्या अन् केशरी रंगाची साडी, धोतर म्हणून नेसली आहे. सोबतच गडद निळ्या रंगाची शालही अंगावर घेतली आहे. आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी त्याने गळ्यात माळही घातली आहे आणि कपाळावर चंद्रकोर लावला आहे. त्याचा हा लूक एकदम सुंदर दिसत आहे.

अभिजीतने फोटोच्या कॅप्शनमध्ये आपल्या पारंपारिक कपड्यांना महत्त्व दिल्याचे दिसते. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मन से रावण जो निकाले, राम उसके मन मे हैं. हे स्त्री चे कपडे, हे पुरूषांचे कपडे अश्या स्टिरिओटाईप्सला ‘राम राम’ करूया. लोप पावत चाललेल्या औरंगाबादच्या अनुभवी कुरेशी कुटुंबातल्या वीणकरांनी विणलेली ही ‘हिमरू’ वीण असलेली रेशमी साडी, धोतर म्हणून तेवढीच सुरेख दिसते. पारंपरिक वीणी (weaves) जपूया… आपल्या वॉर्ड्रोब मध्ये पारंपरिक वस्त्रांचा समावेश करूया.

अभिजीतच्या या पोस्टवर पत्नी सुखदा खांडकेकर हिने लव्ह इमोजी पोस्ट केला आहे. सोबतच अभिनेेत्री समिधा गारूनेही ‘आय हाय’ अशा आशयाची कमेंट केली आहे.

अभिजीतने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत गुरुनाथ सुभेदारची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. ही मालिका २२ ऑगस्ट, २०१६ मध्ये सुरू झाली होती. या मालिकेचा शेवटचा भाग ७ मार्च, २०२१ रोजी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो! अभिनेत्री प्रियांका चोप्राने बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात घातले होते महागडे पिंक जॅकेट, किंमत आली समोर

-एका अभिनेत्रीच्या लग्नाच्या विरोधात उभा राहिला होता संपुर्ण समाज, तरीही प्रियकराशीच केले लग्न

-जीममध्ये सुरु झाली होती अनिता हसनंदानीची लव्हस्टोरी, होणाऱ्या पतीला माहित नव्हती ‘ती’ गोष्ट

हे देखील वाचा