पाकिस्तानच्या दमदार अभिनेत्रींमध्ये माहिरा खान हिच्या नावाचाही समावेश होतो. माहिराने पाकिस्तान इंडस्ट्रीतच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, उरी हल्ल्यामुळे माहिरा बॉलिवूडमध्ये जास्त काळ टिकू शकली नाही. माहिराने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले, की ती डिप्रेशनची शिकार का झाली.
माहिरा खान डिप्रेशनचा करतेय सामना
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Pakistani Actress Mahira Khan) डिप्रेशनचा सामना करत आहे. एका मुलाखतीत तिने खुलासा केला, की तिला मागील 6-7 वर्षांपासून हा आजार आहे. हा आजार तिला शाहरुख खान (Shahrukh Khan) अभिनित हिंदी सिनेमा ‘रईस‘ (Raees) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबतच्या धुम्रपान करतानाच्या फोटोमुळे ट्रोल केल्यानंतर झाला.
‘रईस’मुळे मिळालेल्या धमक्या
माहिराने पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘रईस’ सिनेमाच्या रिलीजनंतर ती डिप्रेशनचा सामना करत होती. तिने खुलासा केला, की सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिला धमकीचे फोन येत होते. कारण, दोन्ही देशातील राजकीय वातावरण तणावाचे बनले होते. माहिरा म्हणाली, “मी रईस सिनेमा पूर्ण केला होता आणि सर्वकाही ठीक सुरू होते. अचानक हा हल्ला (उरी हल्ला) झाला. राजकीयरीत्या सर्वकाही गडबड झाली. गोष्टी खूपच बिघडल्या होत्या. मात्र, मी घाबरले नव्हते, पण मला धमक्या देण्यात आल्या होत्या.”
“सातत्याने ट्वीट आणि फोन येत होते, हे खूपच भयावह असायचे. मला फक्त एवढंच हवं होतं की, मी सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी भारतात जाऊ शकत नाही. मात्र, सिनेमा पाकिस्तानात रिलीज व्हावा. कारण, माझ्या देशातील लोक शाहरुखचे सिनेमे पाहायला जातात. कारण, त्यांना तो खूपच आवडतो,” असेही पुढे बोलताना माहिरा म्हणाली.
View this post on Instagram
रणबीर कपूरसोबतचा धुम्रपान करणारा फोटो झालेला व्हायरल
‘रईस’च्या रिलीजनंतर माहिरा खान रणबीर कपूर (Mahira Khan Ranbir Kapoor) याच्यासोबत धुम्रपान करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यामुळेही तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. माहिरानुसार, या घटनेनंतर ती झोपू शकत नव्हती. ती म्हणते, “यामुळे माझ्यात दडलेली चिंता आणि नैराश्य बाहेर आले. हा माझ्यासाठी खूपच कठीण काळ होता.”
माहिराबद्दल केले जात होते घाणेरडे ट्वीट
माहिरानुसार, रणबीर कपूरसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तिच्याबद्दल घाणेरडे ट्वीट केले जात होते. न्यूज चॅनेल्स तिच्याबाबत प्रतिक्रिया देत होते. ती म्हणते, “त्यावेळी माझा आत्मविश्वास तुटला आणि मी अशी काही चिंताग्रस्त झाले की, एके दिवशी मला पॅनिक अटॅक आला आणि मी बेशुद्ध झाले होते. ते पहिल्यांदाच होते, जेव्हा मी थेरेपीसाठी गेले होते. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. मी अनेक थेरपी केल्या. ते वर्षे खूपच कठीण होते. मी झोपू शकत नव्हते. माझे हात-पाय थरथर कापायचे.”
डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी डॉक्टरांची मदत
माहिराने तो काळ खूपच वाईट असल्याचे म्हटले. तिच्यानुसार, ती मागील 6-7 वर्षांपासून डिप्रेशनमधून बाहेर येण्याच्या गोळ्या घेत आहे. ती नेहमी डॉक्टर आणि रुग्णालयाच्या फेऱ्या मारते. तिच्यानुसार, क्लिनिकल डिप्रेशन हे इतर कोणत्याही वैद्यकीय आणि शारीरिक आजाराप्रमाणेच आहे.
माहिराच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती अखेरची ‘द लिजेंड ऑफ मौला जट’ या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत फवाद खान आणि हुमैमा मलिक यांच्याही मुख्य भूमिका होत्या. (shah rukh khan movie raees fame actress mahira khan revealed she is suffering from depression form last 6 to 7 years)
हेही वाचा-
शाहरुख अन् सनीमधील भांडण संपलं! ‘Gadar 2’ पाहण्यापूर्वी ‘किंग’ खानने केलेला ‘पाजी’ला फोन
सनीने जिंकली कोट्यवधी मने! विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत अभिनेत्याने साजरा केला रक्षाबंधन सण- व्हिडिओ