बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले ही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने नेहमीच चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत आली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या डान्ससाठी देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. रुपाली ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
बिग बॉस मराठी २ नंतर तर तिची लोकप्रियता आणखीनच वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ती तिच्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती तिचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. आता देखील तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रुपाली भोसलेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा काळया रंगाच्या शॉर्ट ड्रेसमधील एक फोटो शेअर केला आहे. या ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे टिपके देखील आहे. या ड्रेसमध्ये ती नेहमी प्रमाणेच खूप बोल्ड आणि ब्युटिफुल दिसत आहे.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव देत तसेच पोज देत तिने हे फोटोशूट केले आहे. एका फोटोत तिने गॉगल देखील घातला आहे. तिचे हे फोटो बघून अनेक चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे. हे फोटो वेगाने व्हायरल होत आहे.
रुपाली भोसलेने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटात काम केले आहे. तिने ‘बडी दूर से आये है’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘चांदी’, ‘मुक्ती’, ‘जुबान संभाल के’, ‘आजोबा वयात आले’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. पण बिग बॉसने तिला खूप ओळख निर्माण करून दिली. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे संजना नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे.










