जिया खान आत्महत्या प्रकरणातील जवळपास कित्येक वर्ष चाललेली लढाई अभिनेता सूरज पंचोलीलासाठी आव्हानात्मक होती. या वर्षी एप्रिलमध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. आयुष्यात असे चढउतार आले तरी सुरजचा प्रेमावर विश्वास कायम आहे. अलीकडेच तो इंडस्ट्रीबद्दल बोलला आणि यादरम्यान त्याने त्याच्या लव्ह लाईफचा उल्लेख केला. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
सूरज पांचोली (Sooraj Pancholi) प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत असतो. 2013 मध्ये जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे सूरज खूप चर्चेत राहिला. मात्र आता त्याची या प्रकरणातून सुटका झाली आहे. अभिनेत्यानेही जिया खानबाबत मौन सोडले आहे. त्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. अभिनेता लवकरच एका नवीन म्युझिक व्हिडिओसह पुनरागमन करण्यास सज्ज आहे. याशिवाय वेब सीरिजबाबतही चर्चा सुरू आहे.
सुरज नवनवीन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून आपलं करिअर पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. अभिनेत्याने अलीकडेच खुलासा केला आहे की, तो 7 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. सूरजने असेही सांगितले की काही वर्षांत त्याचे लग्न होऊ शकते. याशिवाय सूरजने दिवंगत अभिनेत्री आणि गर्लफ्रेंड जिया खानसोबतच्या नात्याबद्दलही सांगितले.
सूरज म्हणाला की, “जियाबरोबर माझे फार कमी काळ संबंध होते. तेव्हापासून मी रिलेशनशिपमध्ये आहे. आम्ही 7 वर्षांपासून एकत्र आहोत. ही एक अतिशय सुंदर अनुभूती आहे जी मी शब्दात व्यक्त करु शकत नाही.”सूरजने अद्याप त्या मिस्ट्री गर्लबाबत कोणताही खुलासा केला नसला तरी तो रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने कबूली दिलेली नाही.
दरम्यान, 2013 मध्ये अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. यानंतर जियाला भडकवल्याप्रकरणी सूरजला अटक करण्यात आली होती. सूरज पांचोलीसाठी गेली 10 वर्षे खूप कठीण गेली. आता अलीकडे जरीना वहाब आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीने आपल्या नवीन नात्याबद्दल खुलासा केला आहे. (Actor Sooraj Pancholi will get married soon)
अधिक वाचा-
–ए. आर. रहमान यांच्या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ, लोकांची गैरसोय आणि चेंगराचेंगरी झाल्याने गायक आणि टीमवर कारवाई
–जिनिलीया पुन्हा गरोदर असल्याच्या अफवांवर रितेशने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला अजून 2-3 मुलं…’