'रात्रीस खेळ चाले' या मालिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली.
या मालिकेत अपूर्वाने साकारलेली शेवंता ही भूमिका तुफान गाजली.
ती मालिका संपल्यानंतर लगेचच अपूर्वाला 'तुझं माझं जमतंय' ही दुसरी मालिका मिळाली होती.
या मालिकेतली तिची पम्मी ही भूमिकाही प्रेक्षकांना आवडली, पण काही कारणामुळं तिनं ही मालिका देखील सोडली.
सध्या ती स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करत आहे.