संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी वैद्यकीय सोयी सुविधांचा तुटवडा देखील जाणवत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता भासत आहे. वेळेत सुविधा न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहे. अनेकजण रुग्नांना मदत देखील करत आहे. यातच बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमार याने कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी पुन्हा एकदा हात सरसावले आहे.
अक्षय कुमारने माजी क्रिकेटर आणि दिल्लीतील लोकसभा सदस्य गौतम गंभीर यांच्या फाउंडेशनमध्ये एक कोटी रुपये जमा केले आहे. यातून कोरोना रुग्णांना मदत केली जाणार आहे. याची माहिती स्वतः गौतम गंभीर यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.
गौतम गंभीरने लिहिले आहे की, ” या कसोटीच्या काळात प्रत्येकाची मदत ही रुग्णांसाठी एक आशेचा किरण घेऊन येणार आहे. गरजू कोरोना रुग्णांसाठी जेवण, औषधे आणि जेवणासाठी या रकमेचा उपयोग केला जाईल. गौतम गंभीर फाउंडेशनला एक कोटी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देव तुमचं भलं करो.”
Every help in this gloom comes as a ray of hope. Thanks a lot @akshaykumar for committing Rs 1 crore to #GGF for food, meds and oxygen for the needy! God bless ???????? #InThisTogether @ggf_india
— Gautam Gambhir (@GautamGambhir) April 24, 2021
अक्षय कुमारने गौतम गंभीरच्या या ट्विटला रिप्लाय दिला आहे की,” गौतम गंभीर हा खूप अवघड काळ चालू आहे. मला आनंद होत आहे की, मी तुम्हाला मदत करू शकलो. मला आशा आहे की, आपण लवकरच या संकटावर मात करून यातून बाहेर पडू. सुरक्षित रहा.”
These are really tough times, @GautamGambhir. Glad I could help. Wish we all get out of this crisis soon. Stay Safe ????????
— Akshay Kumar (@akshaykumar) April 24, 2021
असे असले तरी काही चाहत्यांना अक्षयचे गौतम गंभीर फाऊंडेशनला पैसे देणे रुचले नाही. त्यांनी अक्षयचा ट्विटरवर चांगलाच समाचार घेतला आहे. ‘तुला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे. आता परतफेड करण्याची वेळ आली आहे.’ असे एका युजरने म्हटले आहे.
@akshaykumar एखादी मदत महाराष्ट्रातही पाठवा अभिनेते! आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईने सर्व काही दिले आहे ! आता आपली बारी आहे कृतज्ञता व्यक्त करण्याची … मुंबई आणि महाराष्ट्राची जनता आपल्या अभिनयावर नेहमीच प्रेम करते! जय महाराष्ट्र!
— Sudam Bhosle ???? (@Sudamspeaks) April 24, 2021
Akshay sir Plz help Maharashtra too… Afterall it is the state which has given you everything.. so what it is a Non BJP state… Humanity is above all.
— विदूषक (@yeragi_deep) April 24, 2021
Hey Akashay, do you have any idea what happened to the money you donated in PM cares fund ?
— Kuldeep Dangi (@Kuldeepamy) April 24, 2021
@akshaykumar @GautamGambhir सर मैं पत्रकार हूं और कड़वी बात बोलूंगा लेकिन जो हमने ग्राउंड जीरो पर लोगों को केवल तड़पते और मरते देखा है आप लोगों द्वारा दिए गे मदद कभी किसी मजदूर तक नहीं पहुंचा है आशा करता हूं आप लोग के द्वारा दिया गया फंड किसी और तरीके से लोगों तक पहुंचे
— आशीष कुमार (@Ashish_I_Am) April 24, 2021
Even Maharashtra desperately needs help you live in mumbai why don't you bother about Mumbaikars ! Why …? ????????♂️
— Thanos pandit ™ (@Thanos_pandith) April 25, 2021
देशात कोरोनाच्या पहिली लाटेत देखील अक्षय कुमारने अनेक वेळा मदत केली होती. त्याने पीएम केअर फंडला 25 कोरीचे योगदान दिले होते. त्यानंतर बृहन्मुंबई मुन्सीपल कॉरपोरेशनला पीपीई किटसाठी 3 कोटी रुपये दिले होते. कोरोना व्यतिरिक्त देखील अक्षय कुमार जिथे कुठे मदतीची गरज असते तिथे धावून गेला आहे.










