Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्न झालेल्या ‘या’ तीन अभिनेत्यांसोबत घेतले जायचे प्रियांकाचे नाव, शेवटी बायकांनीच पुढाकार घेत केले होते ‘हे’ काम

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी, प्रियांका चोप्रा आता परदेशातही स्टार बनली आहे. प्रियांका आज ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. आज तिची कारकीर्द यशाच्या शिखरावर आहे, तर तिच्या आयुष्यात खूप प्रेम करणारा तिचा पती निक जोनासही तिच्यासोबत आहे. तथापि, एक काळ असा होता, जेव्हा प्रियांकाचे नाव बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध नायकाशी जोडले जायचे. असेही म्हणतात की, त्या कलाकारांच्या पत्नींनी प्रियांकाला इंडस्ट्रीमधून बॉयकॉट करण्याचा प्रयत्न देखील केला होता.

ट्विंकल खन्ना-
एकेकाळी प्रियांका चोप्राचे नाव अक्षय कुमारशी जोडले जायचे. दोघांची जोडी पडद्यावर चांगलीच पसंत केली होती. अक्षय-प्रियांकाने अनेक सिनेमात तेव्हा एकत्र काम केले होते. त्यावेळी, बातम्या येऊ लागल्या होत्या की, अक्षय प्रियांकाला पसंत करू लागला आहे. या बातमीने ट्विंकल आणि अक्षयच्या विवाहित जीवनात खळबळ उडाली. असे म्हणतात की, अक्षयने प्रियांकासोबत काम करणे ट्विंकलला पसंत नसे. अशा परिस्थितीत आपल्या घराची शांतता कायम ठेवण्यासाठी, अक्षय प्रियांकापासून दूर झाला आणि त्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केले नाही.

सुझान खान-
आज जरी सुझान हृतिक रोशनपासून वेगळी झाली असेल, तरी एकेवेळी ती त्याची पत्नी होती. हृतिक आणि प्रियांकाच्या अफेअरच्या फारश्या बातमी समोर आल्या नाहीत, पण असे म्हटले जाते की, ‘क्रिश’ चित्रपटाच्या दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. याबद्दल सुझान खूप नाराज झाली. अशा परिस्थितीत हृतिकने प्रियंकासोबत काम करणार नाही, असा निर्णय घेतला. त्याचवेळी ऑफ कॅमेरा देखील हृतिक प्रियंकापासून दूर राहू लागला होता.

गौरी खान-
शाहरुख आणि प्रियांकाची प्रेमकथा कुणापासून लपलेली नाही. डॉन चित्रपटादरम्यान शाहरुख आणि प्रियांका एकमेकांच्या खूप जवळ आले होते. या वृत्तामुळे शाहरुखची पत्नी गौरी खूपच चिंतेत राहायची. गौरीला माहित आहे की, शाहरुख एक रोमॅन्स किंग आहे आणि तो बर्‍याच सौंदर्यांसह पडद्यावर रोमॅन्स करतो. पण प्रियांकासोबत शाहरुखचा रोमॅन्स तिला आवडत नव्हता. शाहरुख आणि प्रियांकाने एकत्र काम करणे गौरीला पटत नव्हते, त्यानंतर शाहरुखने स्वत: ला प्रियांकापासून दूर केले.

असे म्हणतात की, या सर्व गोष्टींचा प्रभाव प्रियांकाच्या कारकिर्दीवर पडू लागला होता. अक्षय, हृतिक आणि शाहरुख सारख्या कलाकारांसोबत चित्रपट बनवणाऱ्या अनेक दिग्दर्शकांनी प्रियांकाला त्यांच्या चित्रपटात घेणे बंद केले होते. तथापि, तिने तिच्या कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केले आणि जबरदस्त अभिनयाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यानंतर ती हॉलिवूडमध्ये गेली आणि तेथील अनेक हिट मालिका आणि चित्रपटांचा भाग बनली. आज प्रियांका ग्लोबल स्टार असून, तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करतात.

हे देखील वाचा