अशोक सराफ यांची ओळख मराठी माणसांना सांगण्याची गरज नाही. त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या अशोक सराफ यांना अनेक कलाकार मानतात. नुकतीच अशोक सराफ यांना ‘चला हवा येऊ द्या’ फेम भाऊ कदम यांनी भेट दिली. या भेटीत भाऊ कदम यांनी अशोक सराफ यांच्या पायावर डोके टेकून आशीर्वाद घेतला. यावेळी अशोक सराफ यांनी भाऊ कदमला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अभिनयासाठी प्रशंसा केली.
भाऊ कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या भेटीबद्दल पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अशोक सराफ यांच्याबद्दल लिहिले आहे, “अशोक सराफ मामांची भेट झाली.” ते म्हणाले की, माझ्यासाठी आयुष्यातील एक महत्त्वाची भेट. माझ्यासाठी ते आदर्श आहेत. आजही त्यांचा अभिनय पाहून मला प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
या भेटीबद्दल सोशल मीडियावरही चर्चा रंगली आहे. अनेकांनी भाऊ कदमच्या या कृतीचे कौतुक केले आहे. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दोन विनोदाचे महानायक यानिमित्ताने एकत्र आलेत. भाऊ कदम यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत लिहिले की, “फक्त मराठी कलाकारच जाणो की आपल्या वरिष्ठांना कसा मान द्यावा…लव यू भाऊ.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मामाकी जय हो.” तर आणखी एकाने लिहिले की, “अशोक मामांचा विषय नाही राव…आपला एकमेव आवडता अभिनेता..त्या नंतर सगळे..”
View this post on Instagram
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. त्यांनी अनेकदा गंभीर भूमिकाही साकारल्या आहेत. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक आदर्श कलाकार आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक पिढ्यांच्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. (Brother Kadam and Ashok Saraf video goes viral on social media)
आधिक वाचा-
–शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते 28 टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम
–संजय मिश्रा यांना आयुष्यात बसला होता मोठा धक्का, लाज बाजूला ठेवत करायचे ‘हे’ काम