Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड मोठ्या संकटातून कटरीना आली बाहेर, मानले मदत करणाऱ्या ‘या’ लोकांचे आभार

मोठ्या संकटातून कटरीना आली बाहेर, मानले मदत करणाऱ्या ‘या’ लोकांचे आभार

कोरोनाच्या विखळ्यात सारी दुनिया अडकली आहे. सामान्य लोकांसमवेत अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, आलिया भट्ट यासारखे अनेक कलाकार आहेत, जे कोरोनातून सुखरूप बाहेर पडले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफही याला अपवदा नव्हती. आता ती पुन्हा एकदा घराबाहेर पडली आहे. कॅटरिना कैफची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर ती प्रथमच घराबाहेर पडली आहे. कॅटरिना कैफला मुंबईतील हॉस्पिटलच्या बाहेर नुकतेच स्पॉट केले आहे. १७ एप्रिलला कॅटरिना कैफने कोरोनावर मात केल्याचे समजतेय.

कतरिना कैफ सोमवारी मुंबईतील डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या बाहेर दिसली होती. कॅटरिना कैफने काळ्या रंगाची टोपी आणि चष्मा घातला होता. यासह तिने पांढऱ्या रंगाचा मास्क घातला होता. कॅटरिना कोरोना साथीच्या आजारामुळे अत्यंत काळजीने घराबाहेर पडली होती.

कोरोना चाचणी नेगेटिव्ह आल्यानंतर कतरिना कैफने १७ एप्रिल रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्यात ती आनंदी दिसत आहे. कतरिना कैफने या फोटोसह लिहिले, ‘निगेटिव्ह, ज्यांनीपण माझी काळजी घेतली, त्या सर्वांचे आभार, तुमच्या सर्वांना खूप प्रेम.’

कतरिना कैफच्या एक दिवस आधी तिचा कथित प्रियकर विक्की कौशललाही कोरोना झाल्याचे समजले होते. त्याचवेळी कतरिना कैफची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येण्याच्या आदल्या दिवशीच, विक्की कौशलचा अहवालही निगेटिव्ह आला होता.

कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर ती ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत ‘फोन भूत’ मध्ये काम करताना दिसणार आहे. याशिवाय ‘सूर्यवंशी’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार आणि ‘टाइगर 3’ चित्रपटामध्ये सलमान खान यांच्यासह कतरिना कैफ दिसणार आहे.

हे देखील वाचा