सतीश राजवाडे दिग्दर्शित `मुंबई-पुणे-मुंबई' ह्या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे ही जोडी होती. ह्यातील स्वप्नील जोशीची `गौतम' ही भूमिका अजूनही लोकांच्या लक्षात आहे.

सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या पुस्तकावर हा चित्रपट आधारलेला आहे. ह्याचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले असुन ह्यामध्ये स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर-कोठारे अशी मराठी सिनेसृष्टीतील तगडी स्टारकास्ट आहे.

`शिवम सारंग' हे स्वप्नील जोशीच्या मितवा या चित्रपटातील पात्राचे नाव आहे. स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट मैत्रीची एक आगळी वेगळी व्याख्या स्पष्ट करतो.

`तू हि रे'. चित्रपटाचे कथानक एका सामान्य कुटुंबातील नवरा-बायकोच्या आयुष्यावर आधारलेले आहे. तू हि रे या सिनेमांमधून स्वप्नील जोशी एक रोमॅन्टिक हिरो म्हणून चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाले.

स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर ही जोडी दुनियादारीनंतर पुन्हा या चित्रपटामध्ये एकत्र दिसली. `प्यारवाली लव्हस्टोरी' ह्या सिनेमामध्ये नववीच्या दशकामध्ये झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीच्या परिस्थितीतील कथानक आहे.