Friday, August 1, 2025
Home साऊथ सिनेमा कोरोनाने आणखी एका दिग्गजाचा घेतला बळी! प्रसिद्ध चित्रपट निर्माते रामू यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

कोरोनाने आणखी एका दिग्गजाचा घेतला बळी! प्रसिद्ध चित्रपट निर्माते रामू यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

कोरोना व्हायरसमुळे भारताची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. या व्हायरसमुळे दररोज लाखो लोक संक्रमित होत आहेत, तर यामुळे मरणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. सामान्य लोकांव्यतिरिक्त देशातील दिग्गज मंडळींनी या जगाचा निरोप घेतला आहे. अशातच आता वृत्त आले आहे की, कन्नड सिनेमाचे दिग्दर्शक चित्रपट निर्माते रामू यांचे निधन झाले आहे. ते ५२ वर्षांचे होते. रामू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. ते दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मालाश्री यांचे पती होते.

रामू हे मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने संक्रमित झाले होते, परंतु या जागतिक महामारीसमोर त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.

माध्यमांतील वृत्तानुसार, रामू यांच्या मृत्यूची बातमी कन्नड चित्रपट अकादमीचे अध्यक्ष आणि जवळचे मित्र सुनील पुराणिक यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ‘रामू हे शानदार निर्मात्यांपैकी एक होते. त्यांचे चित्रपट त्यांच्या नावावर चालायचे. त्यांच्या नावाने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे आकर्षित केले होते. चित्रपटात ते मोठ्या प्रमाणात खर्चासाठी ओळखले जायचे.’

अचानक झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

चित्रपट निर्माता बीए राजू यांनी ट्विटरवर रामू यांना श्रद्धांजली वाहत लिहिले की, “सँडलवूडचे निर्माता रामू यांनी कोव्हिड- १९मुळे शेवटचा श्वास घेतला. त्यांच्यावर बंगळुरूच्या एम. एस. रमैय्या रुग्णालयात उपचार सुरू होते, तिथेच त्यांचे निधन झाले. रामू यांनी कन्नड चित्रपट अभिनेत्री मालाश्रीसोबत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.”

रामू यांनी ‘सिम्हा’, ‘अर्जुन गौडा’, ‘एके ४७’ (१९९९), ‘लॉकअप डेथ’ (१९९४), ‘कलसिपाल्या’ (२००४) आणि ‘गंगा’ (२०१५) यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले होते.

रामू यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तब्बल ३० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले होते. त्यांचे अधिकतर चित्रपट हे मोठ्या बजेटचे असायचे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! रोहित शेट्टीने सर्वांसमोर मागितली होती करीना कपूरची माफी; कारण आले समोर

-ट्विटरनंतर आता कंगनाने साधला इंस्टाग्रामवर निशाणा, म्हणाली ‘२०२४ निवडणुकीत भाजपला धोका’

-काळजाला चटका लावणारी बातमी! राष्ट्रीय पुरस्कार विजेते फिल्म एडिटर वामन भोसले यांचे निधन, प्रसिद्ध दिग्दर्शकाने दिली माहिती

-‘अवघ्या १५ दिवसांत कोरोनाने माझा जिवलग मित्र खाल्ला!’ प्रविण तरडेंची फेसबुकवर भावनिक पोस्ट

हे देखील वाचा