दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा आजकाल सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते. ती नवनवीन अंदाजात व्हिडिओ बनवून चाहत्यांचे मनोरंजन करते. मदालसा शर्माने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘जवानी जानेमन’ या गाण्यावर स्टेजवर नाचताना दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा स्टेजवर परफॉर्मेन्स देण्याचा अभिनय करत असते, तेव्हा तिचा सहकारी कलाकार येऊन तिला काही तरी बोलून जातो. त्यानंतर मदालसा विचारात पडते. हा व्हिडिओ मदालसाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या मजेदार व्हिडिओवर चाहत्यांनी नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि तिच्या स्टाईलची प्रशंसा करत आहेत.
मदालसा शर्मा या दिवसात ‘अनुपमा’ या टीव्ही शोमध्ये काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे. तिने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले आहे. मदालसा एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती तेलुगु चित्रपटसृष्टीतली एक नामांकित अभिनेत्री आहे.
मदालसा प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. 90 च्या दशकात महाभारतात शीला यांनी देवकीची भूमिका केली होती. 2009 मध्ये तिने ‘फिटिंग’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. मदालसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. सतत वेगवेगळे फोटो व व्हिडिओ शेअर करून, ती चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. यामुळे सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा शहनाज गिलच्या भावासोबतचा बाथटब व्हिडिओ व्हायरल, एकदा पाहाच
-सल्लू प्रेमींसाठी खुशखबर, सलमानच्या नव्या गाण्याला ९ तासांत तब्बल एक कोटी हिट्स