सलमान खानच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन 17‘मध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा बिझनेसमन विकी जैन यांनी प्रवेश केला आहे. त्यांची जोडी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ‘बिग बॉसच्या घरात त्या दोघांची एंट्री झाली ही बातमी ऐकून चाहते खूप आनंदी झाले होते. मात्र, शोमध्ये त्यांची एंट्री झाल्यापासून त्यांची भांडणे चर्चेचा विषय ठरली आहेत.
गेल्या काही दिवसांत बिग बाॅस (bigg boss 17) अंकिता आणि विकी यांच्यात अनेकदा भांडणे झाली आहेत. या भांडणांचे कारण वेगवेगळे असले तरी, त्यांचा प्रभाव त्यांच्या नात्यावर दिसून येत आहे. अंकिता आणि विकी यांच्यातील भांडणांमुळे त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. 23 ऑक्टोबर रोजीच्या एपिसोडमध्ये, अंकिता आणि विकी यांच्यात जोरदार भांडणे झाली. या भांडणात अंकिताने विकीवर अनेक आरोप केले. तिने आरोप केला की विकी तिच्याशी कधीही गांभीर्याने वागत नाही आणि तो तिच्या भावनांचा आदर करत नाही. या भांडणामुळे अंकिता खूप भावनिक झाली होती आणि तिने रडण्यास सुरुवात केली.
अंकिता आणि विकी यांच्यातील भांडणांमुळे त्यांच्या नात्यावर कोणता परिणाम होईल हे पाहणे औत्सुक्यास्पद असेल. मात्र, त्यांच्या भांडणांमुळे शोची रंजकता वाढली आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजन मिळत आहे. शेवटच्या एपिसोडमध्येही विकी जैनने अंकिता लोखंडेवर आपला राग काढला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर विकी प्रचंड ट्रोल केले जात आहे. इतकेच नाही तर थेट विकी अंकिताला म्हणतो की, तुझ्या या वागण्यामुळे मला लाज वाटत आहे. तू अशाप्रकारचे वागणे कधी बंद करणार? यावेळी विकी हा अंकिताला खडेबोल सुनावतो.
Vicky Jain to his wife Ankita Lokhande
“Zindagi mai mujhe tu kuch de toh paayi nhi atleast mujhe peace of mind hi de do,”
Don’t you think Vicky is overreacting to the situation aur Biwi se aise baatein ???? #BiggBoss_Tak #BiggBoss17
— Adv Rajat prajapati ????????????✈️ (@rajat9565) October 26, 2023
अंकिता लोखंडेसोबत असे वागल्याने विकी जैनला चांगलेच ट्रोल केले जात आहे . एकजण म्हणाला, ‘तुम्हाला नाही वाटत की, विकी जैन या परिस्थितीवर जास्त प्रतिक्रिया देत आहे आणि जो आपल्या पत्नीशी असे बोलतो?’दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘विक्कीची जीभ खूप वाईट आहे. बायकोशी असं कुणी बोलत नाही. आणखी एकाने म्हटले की, ‘म्हणूनच पती-पत्नीने बिग बॉसमध्ये येऊ नये. भांडण सुरू होते. (tv bigg boss 17 vicky jain trolled after losing calm with Famous actress ankita lokhande says you could not give me anything in life)
आधिक वाचा-
–‘अरबाजनेच तिला…’, मलायकाच्या मांडीवर ‘तो’ निशाणा पाहून चाहत्याची लक्ष वेधी कमेंट; पाहा व्हिडिओ
–‘आली आली गं भागाबाई’गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी होणार रिलीज










