भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. पहिल्यापेक्षा या लाटेने देशाचे खूप नुकसान केले आहे. वैद्यकीय गोष्टींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. रुग्णालयात जागा नाही, औषधांचा अभाव, ऑक्सिजन सिलिंडर्सची कमतरता, तसेच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे असंख्य लोकांना दररोज आपला जीव गमावावा लागत आहे. देशाच्या वैद्यकीय यंत्रणेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. यामुळे मोठमोठे लोक आता मदतीसाठी पुढे सरसावताना दिसत आहेत. चित्रपटसृष्टीतील कलाकारांसोबतच, खेळाडूही आपापल्या परीने गरजूंना मदत करत आहेत.
आयपीएलमधील फ्रँचायझी संघ कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सोमवारी (२६ एप्रिल) मोठी घोषणा केली. आपल्या घोषणेत त्याने, भारतातील कोव्हिड- १९ प्रकरणांनी भरलेल्या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ ला ५०,००० डॉलर्स म्हणजेच ३७ लाख रुपये देण्याचे आवाहन केले. यासोबत पॅट कमिन्सने इंडियन प्रीमियर लीग सुरू ठेवण्यास पाठिंबा दर्शविला आहे. त्याच्या या कामगिरीवर केकेआर संघाची सहमालक आणि अभिनेत्री जूही चावलाने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Proud of our Knights .. and Pat for his magnanimous contribution ..!!! ????????????????????????????????????@patcummins30 @KKRidershttps://t.co/PSQeqgM3BS
— Juhi Chawla (@iam_juhi) April 27, 2021
पॅट कमिन्सच्या या बातमीला शेअर करत, जूही चावलाने लिहिले, “आमचा संघ आणि पॅट कमिन्सच्या या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे.” अशाप्रकारे जूही चावलाने या वृत्तावर आपले मत मांडले आहे. तसेच, आपल्या निवेदनात पॅट कमिन्स म्हणाला की, “एक खेळाडू म्हणून आमच्याकडे एक विशेषाधिकार आहे की, आमच्याकडे एक असे व्यासपीठ आहे, ज्याद्वारे आम्ही कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि ज्याला आम्ही चांगल्या गोष्टींसाठी वापरू शकतो. त्या दृष्टीने मी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’मध्ये योगदान दिले आहे. विशेषतः भारतातील रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी मी हे केले आहे.”
Australian cricketer Pat Cummins contributes $50,000 to PM Cares Fund "specifically to purchase oxygen supplies for India's hospitals" pic.twitter.com/9OUDAeJnI9
— ANI (@ANI) April 26, 2021
पॅट कमिन्स याने असेही म्हटले आहे की, त्याला जाणीव आहे की, कोव्हिड- १९ च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. मात्र, असे असताना इंडियन प्रीमियर लीग सुरू ठेवणे योग्य आहे, कारण ही स्पर्धा काही काळासाठी प्रेक्षकांना वेदनांमधून दिलासा देते, असा सल्ला त्याला देण्यात आला होता. तो म्हणाला होता की, “कोव्हिड- १९ च्या संसर्गाचे प्रमाण खूपच जास्त आहे, तर इंडियन प्रीमियर लीग सुरू ठेवणे योग्य आहे की नाही यावर चर्चा चालू आहे.” कमिन्स म्हणाला होता की, “मला सल्ला देण्यात आला आहे की, भारत सरकारला वाटते की इंडियन प्रीमियर लीग चालू राहिल्यावर लॉकडाऊनमध्ये लोकांना दररोज काही तास आनंद आणि दिलासा मिळतो, कारण देश आता कठीण परिस्थितीतून जात आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










