Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

रजनीकांतने चाहत्यांना दिली खास भेट; दिवाळीच्या मुहूर्तावर ‘लाल सलाम’चा टीझर प्रदर्शित

साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सलाम’चा टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. हा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी केले आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. रजनीकांत या चित्रपटात मोईदीन भाईच्या भूमिकेत दिसणार आहेत.

साउथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) सध्या त्याच्या आगामी ‘लाल सलाम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘लाल सलाम’ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. आज दिवाळीच्या मुहूर्तावर रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे.आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाल सलामचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची झलक त्याने चाहत्यांना दाखवली आहे.

या चित्रपटाबद्दल रजनीकांतचे चाहते खूप उत्सुक आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. ‘लाल सलाम’चा दोन मिनिटांपेक्षा कमी कालावधीचा टीझर चित्रपटाचे विश्व निर्माण करतो. ‘लाल सलाम’च्या टीझरची सुरुवात एका गावात क्रिकेट मॅचने होते, कारण खेळपट्टीवर खूप तणाव आहे. यानंतर जातीय चकमकी सुरू होतात, त्यात दंगलीसारखी दृश्येही पाहायला मिळतात.

या चित्रपटात रजनीकांत मोईदीन भाईच्या भूमिकेत दिसणार आहेत. रजनीकांत या चित्रपटात धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या शेवटी रजनीकांत म्हणतात, ‘तुम्ही खेळात धर्म मिसळला आणि मुलांच्या मनात विष कालवले.’ ‘लाल सलाम’मध्ये विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत, तर रजनीकांत चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे. लायका प्रॉडक्शन निर्मित ‘लाल सलाम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल सांगायचे तर, हा चित्रपट पुढील वर्षी 2024मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Rajinikanth gave a special gift to the fans on the occasion of Diwali the teaser of Lal Salaam was released)

आधिक वाचा-
‘बाजीगर’ चित्रपटाला 30वर्षे पूर्ण, अभिनेत्री काजोलने शेअर केली पोस्ट
सो ब्यूटीफुल…, काळजात घंटी वाजावी असा आहे अनन्या पांडेचा लूक; एकदा पाहाच

हे देखील वाचा