भारत देशात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यादरम्यान सरकारने काही आवश्यक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. परंतु सामान्य नागरिकांसोबतच आता कलाकारही हे नियम मोडताना दिसत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अभिनेता जिम्मी शेरगिलला अटक करण्यात आली आहे. एक दिवस आधीच पावती (चलन) करत सुटका केल्यानंतरही वेब सीरिज ‘योर ऑनर’ची टीम रात्री उशीरा कर्फ्यूदरम्यान शूटिंग करत राहिली. यामुळे आता अभिनेता जिम्मी शेरगिलसोबत इतर चार व्यक्तींना शासकीय आदेशाचे उल्लंघन करत महामारी अधिनियम व इतर कलमांखाली गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, कोव्हिड- १९ साठी बनवलेल्या कडक नियमांनुसार सायंकाळी ६ नंतर पंजाबमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही. मात्र, तरीही लुधियानाच्या ‘आर्य सीनियर सेकंडरी शाळे’मध्ये शूटिंग करत असलेल्या ‘योर ऑनर’ वेब सीरिजच्या टीमने निश्चित वेळेपेक्षा २ तास जास्त म्हणजेच रात्री ८ वाजेपर्यंत शूटिंग केली.
मंगळवारी (२७ एप्रिल) सायंकाळी पोलीस शूटिंगच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिथे कोर्टचा सीन चित्रीत केला जात होता. अभिनेता जिम्मी शेरगिल सीरिजमध्ये न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे. लुधियानामध्ये या सीरिजच्या दुसऱ्या सिझनची शूटिंग केली जात होती.
पोलिसांना पाहून सर्वांनी घातले मास्क
जेव्हा पोलिसांची टीम शूटिंग सेटवर पोहोचली, तेव्हा अनेक व्यक्तींनी मास्क घातले नव्हते. पोलिसांना पाहताच तिथे उपस्थित व्यक्तींनी लगेच मास्क घातले. ज्यांच्याकडे मास्क नव्हते, त्यांच्यातील काही जणांनी रुमाल, तर काहींनी जो कपडा मिळाला, त्यानेच तोंड झाकले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर