सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल 12.’ या शोमधील स्पर्धक, जज नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. स्पर्धकांच्या गायनाने तर प्रेक्षक भारावून जात असतात. त्यामुळे हा शो सगळीकडे मोठ्या संख्येने पाहिला जातो. येत्या काही दिवसात या शोमध्ये संगीत दिग्दर्शक अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यामुळे या शोला रंगत चढणार आहे. स्पर्धकांचे आई-वडील देखील या मंचावर उपस्थित राहणार आहे. परंतु या शोमधील स्पर्धक सायली कांबळे एकटीच दिसणार आहे. जेव्हा आदित्य नारायणने तिचे वडील का नाही आले याबाबत विचारले, तेव्हा तिचे उत्तर ऐकून शोमधील सर्वजण भावुक झाले.
या एपिसोडमध्ये सायली खूपच भावुक होते. जेव्हा तिला विचारले की, ‘तू एकटीच का आहेस? तिचे आई- वडील कुठे आहेत.’ यावर तिने उत्तर दिले की, ‘ती तिच्या वडिलांना खूप मिस करत आहे. मागील अनेक वर्षांपासून तिचे तिच्या वडिलांशी काहीच बोलणे झालेले नाहीये. कारण कोरोनाच्या या काळात ते रुग्णांना मदत करण्यात व्यस्त आहे. ते रुग्णांना ने-आणसाठी रुग्णवाहिका चालवतात. दिवसभर पीपीई किटमध्ये असतात. त्यामुळे त्यांना तिच्याशी बोलायला वेळ मिळत नाही.’
या कारणामुळे सायली नेहमीच तिच्या वडिलांची खूप चिंता करत असते. तिचे हे बोलणे ऐकून मंचावरील प्रत्येकजण भावुक झाला. त्यावेळी आदित्यने तिला सांगितले की, “तू चिंता करू नकोस. कारण तुझे वडील जे चांगले काम करत आहेत, ते सगळ ईश्वर बघतोय आणि तो नेहमीच तुझ्या वडिलांना आशीर्वाद देईल.” या एपिसोडमध्ये सायली ‘कभी आर कभी पार’ आणि ‘मिलो ना तुम तो हम घबराये’ ही गाणी गाणार आहे.
Humare sapnon mein hai #IdolNihal ki aawaz! Dekhiye #SuhanaSafarSpecial #IndianIdol2020 iss weekend raat 9:30 baje sirf Sony par.@iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya #AdityaNarayan @fremantle_india @The_AnuMalik @manojmuntashir @NihalTauro pic.twitter.com/TjzoNA9I5j
— sonytv (@SonyTV) April 27, 2021
तिच्या या परफॉर्मन्सनंतर मनोज मुंतशिर यांनी तिचे कौतुक करताना सांगितले की, “सायली मी जेव्हा केव्हा तुझा परफॉर्मन्स बघतो, तेव्हा मला असे वाटते की, तुझ्या आवाजात काही तरी खास गोष्ट आहे. मला तुझा आवाज ऐकून खूप आनंद होत आहे. तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.”
अनु मलिक तिचे कौतुक करताना म्हणाले की, “सायली मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. तुझी गाणे गाण्याची शैली देखील खूप छान आहे. तू तुझ्या वडिलांची चिंता अजिबात करू नकोस, देव त्यांच्यासोबत आहे. ते तुला आता व्हिडिओ कॉलमधून बघत आहेत. तुझा हा परफॉर्मन्स बघून त्यांना खूप आनंद झाला असणार आहे.”
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-धर्मेश इज बॅक! कोरोनावर मात करत कोरिओग्राफर पोहोचला ‘डान्स दीवाने ३’ च्या मंचावर