Monday, January 26, 2026
Home मराठी ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर काळाच्या पडद्याआड

मराठी चित्रपट सृष्टीतील जेष्ट अभिनेते अविनाश खर्शिकर यांचे राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी १० वाजता त्यांनी ठाण्यातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी नाटक, चित्रपट व टीव्ही सिरीयलमध्ये आजपर्यंत अनेक भूमिका निभावल्या. ‘बंदिवान मी या संसारी’ या 1978 मध्ये आलेल्या चित्रपटातून त्यांनी आपल्या सिने अभिनयास सुरुवात केली.

अविनाश खर्शिकर यांनी भुमिका साकारलेले चित्रपट
जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार

अविनाश खर्शिकर यांची गाजलेली नाटकं
तुझं आहे तुजपाशी, सौजन्याची ऐशी तैशी, वासूची सासू, अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, लफडा सदन

हे देखील वाचा