Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

Shreya Bugade : प्रेक्षकांना हसवणाऱ्या श्रेया बुगडेला खऱ्या आयुष्यात वाटते ‘या’ गोष्टीची भीती; म्हणाली…

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेया बुगडे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. श्रेया बुगडे तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत येत असते. सध्या श्रेया बुगडे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडेला ऑडिशनची भीती वाटते. ही एक विचित्र गोष्ट वाटू शकते, कारण श्रेया बुगडे ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ती ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. तिच्या विनोदी अभिनयाने तिने अनेकांना हसवले आहे.

श्रेया बुगडेने (Shreya Bugde Video) नुकताच एक मुलाखतीत खळबळजनक खुलासा केला. तिने सांगितले की, तिला ऑडिशन देताना खूप तणाव येतो आणि भिती वाटते. ती म्हणाली, “मला 50 हजार लोकांसमोर एखाद्या कार्यक्रमात अचानक सादरीकरण करायला सांगितले, तर मला काहीच वाटणार नाही. पण, या ऐवजी जर मला कोणी सांगितलं ऑडिशनला जा सांगितले. तर आदल्या रात्रीपासून मला झोप लागत नाही.”

श्रेया बुगडेने पुढे सांगितले की, सुरुवातीला तिने अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. त्यावेळी तिला खूप भीती वाटायची. तिचा नंबर येण्यापूर्वीच ती अनेकदा ऑडिशनमधून पळून आली आहे. तिच्याबरोबर ऑडिशनला येणाऱ्या इतर मुली एकदम प्रोफेशनल असायच्या. त्यांना पाहून तिला स्वतःची कला तुलनेने कमी वाटायची.

श्रेया बुगडेने सांगितले की, तिने दिलेल्या 99 टक्के ऑडिशन्समध्ये तिचं सिलेक्शन झालेलं नाही. आता सेल्फ टेस्ट हा वेगळा प्रकार चालू झाला आहे. यामध्ये घरबसल्या आपण ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवायची असते. हे तिला त्या मानाने सोयीस्कर जातं.” श्रेया बुगडे ही एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या ऑडिशनबद्दलची ही गोष्ट ऐकून अनेकांना आश्चर्य वाटले असेल. पण, ती एक सामान्य माणूस आहे. तिलाही भीती वाटू शकते. (Shreya Bugde of Chala Hawa Yeu Dya fame is afraid of auditions)

आधिक वाचा-
उर्वशी रौतेला पोहोचली गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात, पूजा करून घेतले देवीचे दर्शन
वृक्षतोडीबाबतची जितेंद्र जोशीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला, ‘महामार्ग निर्माण करताना झाडांची कत्तल…’

हे देखील वाचा