Sunday, August 10, 2025
Home अन्य ‘इंडियन आयडल १२’ च्या मंचावर कमबॅक करणाऱ्या पवनदीपने आईपासून लपवली होती मोठी गोष्ट; सांगताना झाला भावुक

‘इंडियन आयडल १२’ च्या मंचावर कमबॅक करणाऱ्या पवनदीपने आईपासून लपवली होती मोठी गोष्ट; सांगताना झाला भावुक

सोनी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सिंगिंग रियॅलिटी शो म्हणाजे ‘इंडियन आयडल 12.’ या शोमधील स्पर्धक, जज नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. स्पर्धकांच्या गायनाने तर प्रेक्षक भारावून जात असतात. त्यामुळे हा शो सगळीकडे मोठ्या संख्येने पाहिला जातो. येत्या काही दिवसात या शोमध्ये संगीत दिग्दर्शक अनु मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यामुळे या शोला रंगत चढणार आहे. या शोचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करणार आहेत.

या एपिसोडमध्ये पवनदीप राजन दोन आठवड्यानंतर दिसणार आहे. या एपिसोडमध्ये तो ‘माई तेरी चूनर’ या गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसणार आहे. या गाण्यानंतर तो खूपच भावुक झाला आणि मंच्यावरच रडू लागला. तो म्हणाला की, “मी कोरोना पॉझिटिव्ह होतो ही गोष्ट माझ्या आईला देखील सांगितली नव्हती.” हे ऐकून सगळेजण मंचावर आले आणि त्याला मिठी मारून आधार देऊ लागले. कारण कोरोना काळात त्यांनी देखील पवनदीपला खूप मिस केले होते. त्यांनतर अनु मलिक यांनी त्याच्या गाण्याचे कौतुक केले आणि मंच्यावर जाऊन त्याला मिठी मारली. त्यावेळी सगळेजण उभे राहून टाळ्या वाजवत त्याचे कौतुक करत होते.

जेव्हा पवनदीपला विचारले की, हे गाताना तो का रडत होता? तेव्हा त्याने सांगितले की, “या मंच्यावर येऊन मला खूप आनंद होत आहे. मी माझ्या आईला माझ्या तब्बेतीबाबत काहीच सांगितले नव्हते. मी कोरोना पॉझिटिव्ह होतो हे देखील सांगितले नव्हते. मी आज तिला खूप मिस करत आहे. मी आज जे काही आहे ते फक्त तिच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे.”

त्यांनतर अनु मलिक आले आणि त्याला मिठी मारली आणि बोलले की, “मला तुझ्यावर खूप गर्व आहे पवनदीप. तू एक प्रतिभावान व्यक्ती आहे. तुझ्याकडे उत्तम आवाज आहे. तुला या मंच्यावर पुन्हा एकदा बघून मला खूप आनंद होत आहे. माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-एकेकाळी बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवणारी अभिनेत्री मीनाक्षी आता दिसतेय अशी, बँकरसोबत लग्न करून सोडला होता देश

-कोरोनाच्या समोर सोनू सूदही झाला असहाय्य! ट्वीट करत म्हणाला, ‘दिल्लीमध्ये देव शोधणे सोपे, पण…’

-अवघ्या देशाला नजरेने वेड लावणारी प्रिया प्रकाश वाॅरियर, आता नव्या लूकनेही पाडतेय सर्वांना भुरळ! पाहा खास फोटो

हे देखील वाचा