Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

नाट्यगृह पाहुन संतापली प्रिया, म्हणाली,’…ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार ?? ‘

मराठी सिनेसृष्टीपासुन बाॅलिवुडपर्यंत आणि नाटकांपासुन वेबसिरीजपर्यंत आपल्या कामाची छाप उमटवणारी, प्रिया बापट (Priya bapat )आणि तिच्यासोबत तिचा सुसंगत सहकारी उमेश कामत(Umesh kamat). या दोघांची जोडी टाइमपास चित्रपटापासुन सर्वांच्याच लक्षात राहिली आहे.ही जोडी फक्त लक्षातंच राहिली असंही नाही तर अगदीच मनात घर करुन गेली आहे, असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. हेच मराठी इंडस्ट्रीतील ‘क्युट कपल’ सध्याला ‘जर तरची गोष्ट ‘या नाटकातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नुकताच काल पुण्यातील एका नाट्यगृहात त्यांच्या नाटकाचा एक प्रयोग पार पडला.यावेळी मात्र असं काही झालं की नेहमी हसी-मजाक करणारी प्रिया काल भलतीच संतापली होती.

आजकाल सर्वचजण सोशल मीडियावर अपडेट असतात,आपल्या आयुष्यातला आनंद,दुःख, संताप सर्वकाही त्यावरच पोस्ट करत असतात. मग यात प्रिया बापटही आलीच काल झालेल्या ‘जर तरची गोष्ट'(Jar Tarchi Gosht) या नाटकाच्या प्रयोगानंतर प्रियाने एक स्टोरी पोस्ट केली होती. या स्टोरीत प्रेक्षकांच्या वागण्याचा संताप व्यक्त केला आहे. झालं असं की, काल प्रयोग संपल्यावर नाट्यगृहात प्लास्टिकचा कचरा , खऊची पाकिटं ,रॅपरस इ. कचरा नाट्यगृहात तसाच पडला होता. यामुळे संतापलेल्या प्रियाने प्रेक्षकांची यावरुन चांगलीच कानउघाडणी केली आहे. प्रियाने नाट्यगृहातील कचऱ्याचा फोटो आपल्या स्टोरीला शेअर करत त्यावर कॅप्शन लिहिले, ” नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा नाट्यगृहात नाही .ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार ?? ”

प्रिया बापटच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीसोबतंच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. त्याचसोबत मालिका, चित्रपट, नाटक आणि वेबसिरीज अशा सर्व माध्यमांतुन ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिने 2002 मध्ये बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. पुढे तिने मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्ना भाई, काकस्पर्श, टाइमपास 2, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा