सध्या मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही लग्नसराईचा मोसम आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच काहीदिवसांपूर्वी म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानी(Rakul Preet Singh and Jackky Bhagnani ) विवाहबंधनात अडकले. दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली. आता त्यांच्या मेहेंदी सेरेमनीची (Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Mehendi Ceremony ) चर्चा सुरु झाली आहे.
लग्नानंतर रकुल आणि जॅकी लग्नसोहळ्याचे काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत आहे. अशातच दोघांच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल(Rakul – Jackky Mehendi Ceremony) झाले आहे. हे फोटो पाहून नेटकरी रकुलवर भलतेच फिदा झाले आहेत.
मेहंदी सेरेमनीसाठी रकुलने खास नारंगी रंगाच वर्क केलेला लेहेंगा परिधान केला होता. तर कानात मोठे झुमके घातले होते. यामध्ये रकुल खुपच सुंदर दिसत होती. लग्नापेक्षा मेहेंदी सेरेमनीचा लूक चाहत्यांच्या जास्त पसंतीस पडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये ‘लग्नापेक्षा या आऊटफिटमध्ये सुंदर दिसतीय. असं म्हटलं आहे.
तर जॅकी भगनानीने या सेरेमनीला गुलाबी रंगाचा कुडता परिधान केला होता. यामध्ये जॅकी एकदम कुल दिसत होता. रकुलने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘तू माझ्या आयुष्यात रंग भरत आहेस’. तुझ्या नावाची मेहंदी. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या डिझायनरचेही आभार मानले आहेत. फुलकरीला पुनरुज्जीवित करणारा सर्वात सुंदर पोशाख डिझाइन केल्याबद्दल @arpita__mehta चे आभार. यासोबतच रकुलने फोटोग्राफरचेदेखील आभार मानलं आहेत.
रकुल आणि जॅकी यांनी त्यांचं लग्न अतिशय प्रायव्हेट ठेवलं. त्यांनी आनंद कारज पद्धतीने विवाह केला आहे. आनंद कारज या पद्धतीला शीख धर्मात खूप महत्व आहे. याचा अर्थ आनंदासाठी कार्य करणे किंवा आनंदी जीवनासाठी कार्य करणे. याची सुरुवात शीख गुरु अमर दास यांनी केली होती. या लग्नात फक्त चार फेऱ्या होतात, तर हिंदू धर्मात सात फेरे घेतले जातात.