महाराष्ट्राची ‘कलरफूल’ अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण( Pooja-siddhesh wedding) यांचा लग्नसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. तिला नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी चाहते भरभरुन शुभेच्छा देत आहेत. सध्या सोशल मीडियावर या लग्नसोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच तिनं स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर काही लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. फेब्रुवारी महिन्यात पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाआधीच्या ( Pooja-siddhesh wedding) विधींना सुरुवात झाली होती. त्यानंतर ही जोडी २८ फेब्रुवारीला लग्न बेडीत अडकली.
View this post on Instagram
पुजाने शेअर केलेल्या फोटोवरुन असं दिसते की, तिचा हा लुक सप्तपदीचा आहे. या विधीसाठी पुजाने पिवळ्या रंगाची भरजरी पैठणी, हातात हिरवा चुडा, गळ्यात शोभेल असं दागिने परिधान केले होते. या लूकमध्ये पुजा खुपचं सुंदर दिसत होती.
View this post on Instagram
तर सिद्धेशने ऑफ व्हाईट रंगाचा भरजरी कुडता परिधान केला होता. फेटाही त्यांच रंगाचा परिधान केला होता. गळ्यात मोत्याची माळ. या लुकमध्ये सिद्धेश हॅन्डसम दिसत होता.
View this post on Instagram
मोठ्या थाटामाटात पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाणचा विवाहसोहळा पार पडला. जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीमध्ये पूजा आणि सिद्धेश यांनी लग्न केले. मराठी सिनेसृ्ष्टीतील अनेक कलाकारांनी पूजा आणि सिद्धेशच्या लग्नाला हजेरी लावली होती.
View this post on Instagram
पूजा आणि सिद्धेशचं लग्न हे अरेंज मॅरेज पद्धतीत जमलं होतं. अभिनेत्रीचा नवरा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. अभिनेत्रीने तिच्या आणि सिद्धेशच्या नात्याबद्दल सर्वप्रथम गश्मीर महाजनीची बायको गौरीला सांगितलं होतं. यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जोडीदाराबरोबर फोटो शेअर करत पूजाने सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.
View this post on Instagram