टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आजकाल तिच्या ताज्या फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे. नुकतेच या अभिनेत्रीने वजन कमी केले आहे, त्यानंतर आता ती अधिकच तरुण दिसू लागली आहे. वाढत्या वयात ती फिटनेसच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करताना दिसत आहे. श्वेता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत राहते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने आपल्या फोटोशूटने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये तिचा अतिशय मनमोहक असा लूक पाहायला मिळत आहे. यावेळीही श्वेता फोटोंमध्ये अप्रतिम दिसत आहेत. सिल्वर रंगाच्या चमकदार लेहेंग्यामध्ये, श्वेता तिची टोन्ड बॉडी सादर करण्याची एकही संधी सोडत नाहीये.
तसेच श्वेता तिवारीने तिचे दहा किलो वजन कमी करून हा स्टनिंग लुक मिळविला आहे. यासोबतच ती दिवसेंदिवस अधिकाधिक सुंदर दिसू लागली आहे. सिल्व्हर लेहेंग्यासह ट्यूब टॉपमध्ये तयार झालेल्या श्वेताचे तंदुरुस्त आणि पातळ शरीर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नुकतेच श्वेता तिवारीने हिरव्या रंगाचा रफल ड्रेस परिधान करून फोटोशूट केले होते. हे फोटो पाहून तिचे चाहते अक्षरशः वेडे झाले होते. श्वेता तिवारीची वेगळाच अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळाला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर श्वेता तिवारी अखेरच्या वेळेस वरुण बडोलाच्या समवेत ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेमध्ये झळकली होती. गेल्याच वर्षी ही मालिका ऑफ एअर झाली आहे. ती टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ मधील तिच्या अभिनयाने ती घराघरात पोहचली होती. याशिवाय अभिनेत्री ‘नागीन’, ‘सीता और गीता’ आणि ‘परवरिश- कुछ खट्टी कुच्छ मीठी’ यांच्यासह टीव्हीवरील अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.