Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड बॉयफ्रेंड सोबत तिरुपतीला गेली जान्हवी कपूर ! आईच्या जन्मदिनाचे औचित्य…

बॉयफ्रेंड सोबत तिरुपतीला गेली जान्हवी कपूर ! आईच्या जन्मदिनाचे औचित्य…

बॉलिवूडची ‘चांदणी’ अर्थात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी हिचा आज जन्मदिन. यानिमित्ताने श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने तिरुपतीला भेट दिली आहे. भगवान व्यंकटेश्वराच्या प्रसिद्ध हिल मंदिराला भेट देताना आणि प्रार्थना करताना यावेळी तिच्यासोबत तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही दिसला. 

  मंगळवारी सकाळी जान्हवीने श्रीदेवीच्या जनमदिनानिमित्त भगवान बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दर्शनासाठी आलेल्या अभिनेत्रीने गोल्डन प्रिंट आणि पिवळ्या बॉर्डरचा ब्लाउज असलेली पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. सोन्याचे कानातले, नेकलेस आणि कंबर ब्रेसलेटसह जान्हवी यावेळी सुंदर दिसत होती.

अभिनेत्री जान्हवीनेही तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आणि एक छोटा संदेश देखील लिहिला. तिने आईसोबतचे काही जुने फोटोही पोस्ट केले आहेत. जुन्या फोटोत श्रीदेवी जान्हवीच्या खांद्यावर हात ठेवलेली दिसत आहे. जान्हवीने लिहिले, ‘हॅपी बर्थडे आई. लव्ह यू.’

जान्हवीचे वडील आणि श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनीही त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त त्यांची आठवण काढली आहे. बोनी कपूरने इंस्टाग्राम पोस्टमध्ये श्रीदेवीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यासोबत कॅप्शन आहे, ‘हॅप्पी बर्थडे माय लव्ह’. त्याचवेळी, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूरनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक जुना फोटो शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –  

संभाजीची येसू ते पुष्पाची श्रीवल्ली; हे आहेत रश्मिकाचे आगामी सिनेमे…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा