Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्रीवर लावले गंभीर आरोप; तो मला शॉर्ट स्कर्टमध्ये संपूर्ण युनिटसमोर बसवायचा…

तनुश्री दत्ताने विवेक अग्निहोत्रीवर लावले गंभीर आरोप; तो मला शॉर्ट स्कर्टमध्ये संपूर्ण युनिटसमोर बसवायचा…

तनुश्री दत्ताने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००५ ते २०१० पर्यंत बहुतेक चित्रपटांमध्ये ती दिसली. तिने ‘आशिक बनाया आपने’, ‘भागम भाग’ आणि ‘ढोल’ सारख्या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती चित्रपटांपासून दूर असली तरी अजूनही चर्चेत आहे. आता तनुश्रीने ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीसोबत काम करतानाचा वाईट अनुभव शेअर केला आहे. 

एका मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तनुश्री हे सांगत आहे की, सेटवर लहान कपडे घालूनही तिला व्हॅनमध्ये बसू दिले जात नव्हते. सेटवर अवघ्या पाच मिनिटे उशिरा आल्याबद्दल तीला ओरडण्यात आले. तिला एकही शॉट न घेता दिवसभर वाट पाहावी लागली.

२००५ च्या ‘चॉकलेट’ या चित्रपटात विवेकसोबत काम करणाऱ्या तनुश्रीने तिचा अनुभव सांगताना सांगितले की, ‘एक दिवस मी सेटवर पाच मिनिटे उशिरा पोहोचले तेव्हा विवेक माझ्यावर ओरडला आणि मला अनप्रोफेशनल सुद्धा म्हटला. कधी-कधी मी सेटवर यायचे तेव्हा लाईटही चालू नसत, सेटही तयार नसे, पण एके दिवशी मी जरा उशिरा आले, पाच मिनिटं, फक्त पाच मिनिटं आणि मग तो सेटवर फक्त एवढंच पाहण्यासाठी आला की मी आलेय की नाही? 

तनुश्रीने हे देखील उघड केले की विवेकने तिला सेटवर कसे अस्वस्थ केले. त्याने सेटवरील लोकांना मला व्हॅनमध्ये विश्रांती घेण्यास किंवा कपडे घालू देण्यास मनाई केली होती. अभिनेत्री म्हणाली, ‘कलाकारांनी शूटिंग नसताना व्हॅनमध्ये आराम करावा. मी रोब जरी घालून बसायचे, तर ते म्हणायचे, ‘ आता शॉट येणार आहे, काढा ते ! तो मला शॉर्ट स्कर्टमध्ये संपूर्ण युनिटसमोर बसवायचा. 

तनुश्रीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. तीच्या चित्रपटांच्या यादीत ‘आशिक बनाया आपने’, ‘वीरभद्र’, ‘चॉकलेट’, ‘भागम भाग’, ’36 चायना टाउन’, ‘रकीब’, ‘ढोल’, ‘झोखिम’, ‘रफ्तार’, ‘सास बहू’ ‘सेन्सेक्स’, ‘अपार्टमेंट’, ‘हमने ली है शपथ’ आणि इतर चित्रपटांचा समावेश आहे. तनुश्रीची कारकीर्द लहान असेल, परंतु तिच्या भूमिकांसाठी तिला खूप कौतुक मिळाले आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 12th फेल चा समावेश का नाही ? सोशल मिडीयावर विलक्षण चर्चा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा