Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड दुखापत असूनही सलमान सुरु करतोय सिकंदरचे चित्रीकरण; ४५ दिवस चालणार शेड्यूल…

दुखापत असूनही सलमान सुरु करतोय सिकंदरचे चित्रीकरण; ४५ दिवस चालणार शेड्यूल…

बॉलीवूडचे सुपरस्टार्स नेहमीच त्यांच्या कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण करतात, मग परिस्थिती काहीही असो. बरगडीला दुखापत असूनही, सलमान खानने त्याच्या पुढच्या मोठ्या चित्रपट सिकंदरचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. ए.आर. मुरुगादास दिग्दर्शित या ॲक्शन-एंटरटेनरमध्ये सलमानसोबत रश्मिका मंधना देखील दिसणार आहे. सध्या सिकंदरची टीम चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या सुरू असलेल्या शूटिंगदरम्यान, निर्माता साजिद नाडियाडवालासोबत सलमान खानचा एक फोटो सोशल मिडीयावर समोर आला आहे.

बरगडीला दुखापत होऊनही सलमान खानने सिकंदरचे शूटिंग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सलमान त्याच्या चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियादवालासोबत हसताना दिसत आहे. सलमानने काळा शर्ट घातला आहे, तर साजिदने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. रिपोर्टनुसार हा फोटो सिकंदरच्या सेटवरचाच आहे.

सिकंदरची टीम सध्या धारावी आणि माटुंग्यावर आधारित अतिशय बारकाईने तयार केलेल्या सेटवर काम करत आहे. हा सेट तयार करण्यासाठी निर्मात्यांना 15 कोटी रुपये खर्च आला. बरगडीला दुखापत असूनही सलमानने अत्यंत सावधगिरीने कामगिरी बजावली आहे हेही यावरून दिसून येते. हे शेड्युल ४५ दिवस चालणार आहे. त्यानंतर क्रू प्रोडक्शनच्या पुढील टप्प्यासाठी हैदराबादमधील एका पॅलेसमध्ये शूट करण्यासाठी जाईल.

या वर्षी मे महिन्यात रश्मिका मंधनाने ए आर मुरुगादास यांच्या सिकंदर या चित्रपटाचा भाग असल्याची पुष्टी केली होती. रष्मिका पहिल्यांदाच सुपरस्टार सलमान खानसोबत काम करणार आहे. 

बाहुबली फेम अभिनेता सत्यराज या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. बॉलीवूडच्या भाईजानला आपला सर्व वेळ आणि लक्ष सिकंदरवर केंद्रित करायचे आहे. २०२५ च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे सलमान खानने गेल्या दोन महिन्यांत इतर अनेक कामांना निरोप दिला आहे. या चित्रपटात सलमान जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

आणि एका रात्रीत बदलले ‘मै हु ना’ चे पोस्टर्स; सुश्मिता सेनने सांगितला किस्सा…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा