बॉलिवूडमधील ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान आणि ‘दबंग’ सलमान खान हे केवळ इंडस्ट्रीमधील टॉप कलाकार नाहीत, तर एकमेकांचे खूप चांगले मित्र देखील आहेत. सलमान आणि आमिरने जवळपास एकत्रच त्यांच्या करिअरला सुरुवात केली आणि एकत्र त्यांना यश देखील मिळाले आहे. आज दोघेही बॉलिवूडमधील सुपरस्टार आहेत. आज भलेही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत पण एक काळ असा होता जेव्हा सलमान खानचे वागणे आमिर खानला अजिबात आवडत नसत. या गोष्टीचा खुलासा त्याने काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये केला होता.
सलमान खान आणि आमिर खान या दोघांनी अंदाज अपना अपना या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात काम करताना ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखू लागले होते. या चित्रपटात त्यांची चढाओढ सगळ्याच प्रेक्षकांना खूप आवडली होती. परंतु अमर-प्रेम यांची जोडी खऱ्या आयुष्यात त्याकाळी चांगले मित्र नव्हते.
आमिर खानने कॉफी विथ करण या शोमध्ये सांगितले होते की, सलमान खानचा सगळ्यात पहिला प्रभाव त्याच्यावर चांगला पडला नव्हता. परंतु नंतर ते खूप चांगले मित्र झाले. आमिर खानने सांगितले होते की, “अंदाज अपना अपना या चित्रपटात काम करताना त्याचा सलमान खान सोबतचा अनुभव चांगला नव्हता. त्यावेळी मला त्याचे वागणे अव्यावहारिक वाटले होते. त्याच्या सोबत काम केल्यानंतर मला असे वाटले होते की, त्याच्यापासून लांब राहणेच फायद्याचे ठरेल.”
परंतु कालांतराने ते दोघेही एकमेकांचे खूप चांगले (जिगरी) मित्र झाले. ही गोष्ट त्या वेळेसची आहे जेव्हा 2002 मध्ये आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना हे दोघे घटस्फोट घेत होते. त्यावेळी आमिर खान खूप दारू पित असे. अशा वेळी सलमान एक दिवशी त्याचा घरी गेला. आमिर खानने सांगितले की, “सलमान खान माझ्या आयुष्यात त्यावेळी आला जेव्हा मी खूपच एकटा होतो. माझा आणि रीनाचा घटस्फोट झाला होता. एके दिवशी माझी सलमान खानसोबत भेट झाली. तेव्हा त्याने मला सांगितले की, तो मला भेटायला येण्याचा विचार करत होता. त्यांनतर आम्ही एकत्र बसून दारू प्यायलो आणि तिथूनच आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. आमची ही मैत्री आजही कायम आहे आणि वेळेनुसार ती वाढतच आहे.”
अनेक वेळा प्रेक्षक सलमान आणि आमिर खान यांच्या स्टारडमची तुलना करत असतात. परंतु त्या दोघांनाही एकमेकांचे काम खूप आवडते. त्यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आमिर खान लवकरच त्याच्या ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे, तर सलमान खानचा ‘राधे’ हा चित्रपट 13 मेला प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पंगा क्वीन’ कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल, पाहा काय घातलाय राडा?
-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!