Thursday, September 19, 2024
Home टॉलीवूड पुढील चार महिन्यांत प्रदर्शित होणार हे दमदार ॲक्शन सिनेमे; हिंदी सह साउथ मार्केट सुद्धा गाजवणार…

पुढील चार महिन्यांत प्रदर्शित होणार हे दमदार ॲक्शन सिनेमे; हिंदी सह साउथ मार्केट सुद्धा गाजवणार…

या वर्षी ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, अल्लू अर्जुन यांच्याशिवाय अनेक स्टार्सचे ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या सर्व चित्रपटांमध्ये अप्रतिम ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या सर्व चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या वर्षी कोणते ॲक्शन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊया.

देवरा पार्ट 1 

देवरा हा या वर्षातील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ज्युनियर एनटीआरची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे. देवरा या वर्षी २७ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

सिंघम अगेन 

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेन हा एक ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपट असेल, जो या वर्षी १ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ शकतो. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे, ज्यामध्ये रणवीर सिंग, अर्जुन कपूर, अजय देवगण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कांगुवा

कांगुवा हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला ॲक्शन चित्रपट आहे. हा चित्रपट १०  ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता सूर्या दिसणार आहे. या चित्रपटात चाहत्यांना सूर्याची आतापर्यंतची सर्वात वेगळी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे.

जिगरा

जिगरा यावर्षी ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भाऊ आणि बहिणीच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात आलिया अभिनेता  वेदांगच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

पुष्पा २

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची जोडी पुन्हा एकदा पुष्पा २ मध्ये दिसणार आहे. पुष्पा २ यावर्षी ६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अनेक ट्रेलर आणि टीझर रिलीज झाले आहेत. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

आयुष्यात आवश्यक असते ती वचनबद्धता; सुश्मिताने शेयर केली एक आगळी वेगळी पोस्ट…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा