येत्या वर्षात पुढील चार महिन्यांत काही जबरदस्त ॲक्शन  सिनेमे प्रदर्शित होणार आहेत आज पाहूयात कोणते आहेत ते सिनेमे

यात काही हिंदी सिनेमे आहेत तर काही तेलुगु सिनेमे

सिंघम अगेन- या चित्रपटात अजय देवगन, अक्षय कुमार सहित एक मोठी स्टार कास्ट दिसणार आहे. हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे

पुष्पा २ - हा चित्रपट अल्लू अर्जुन, फहाद फासील आणि रश्मिका मंधना यांचा असून सुकुमार यांनी दिग्दर्शन केलंय. डिसेम्बर महिन्यात हा चित्रपट येऊ शकतो

जिगरा - या सिनेमात आलीया भट्ट जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होतोय

देवरा - ज्युनियर एनटीआर अभिनित या चित्रपटात सैफ आली खान आणि जान्हवी कपूर हेदेखील आहेत. हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेt