बॉलिवूडमधील ‘दबंग खान’ म्हणजेच सलमान खान हा अजूनही चित्रपटात आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत आहे. त्याचे जवळपास सगळेच चित्रपट सुपरहिट होतात. पण त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्री आज चित्रपटसृष्टीमध्ये दिसत नाहीत. अनेकांनी त्यांच्या करिअरला पूर्णविराम दिलेला दिसत आहे. सलमान खानच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका निभावलेली अभिनेत्री शीबा ही अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीमधून गायब झाली आहे. ती आता खूपच बदललीय
शीबा आकाशदीप हीचा जन्म मुंबई मधील एका पंजाबी कुटुंबात झाला आहे. हिंदी आणि पंजाबी चित्रपटासोबत तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.
सूर्यवंशी फेम शीबा हिने ‘प्यार का साया’ आणि ‘दम’ या चित्रपटात काम करून तिची ओळख निर्माण केली होती. यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. शीबाने टीव्हीवरील ‘हासिल’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रवेश केला होता.
अभिनेत्री शीबाने तिच्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात सुनील दत्त यांच्या ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून केली होती. परंतु सूर्यवंशी या चित्रपटात सलमान खानसोबत काम केल्यानंतर ती चर्चेत आली.
शीबाचे लग्न फिल्ममेकर आकाशदीप यांच्यासोबत झाले आहे. या दोघांची पहिली भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आकाशदीप हे शीबाच्या दोन चित्रपटाचे दिग्दर्शक देखील होते. शीबा आणि आकाशदीप यांचे लग्न 1996 मध्ये झाले होते. शीबाला आता दोन मुले आहेत. त्यांची नावे हृदय आणि भविष्य आहेत. शीबाचे पती आकाशदीप हे एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
आज शीबा चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर मात्र ती खूप सक्रिय असते. ती तिचे स्टायलिश फोटो आणि फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-डॉक्टरांना ‘सैतान’ म्हणणे सुनील पालला पडले भलतेच महागात! कॉमेडियन विरोधात एफआयआर दाखल
-काय आहे प्रियांकाच्या सौंदर्य आणि तंदुरुस्तीचे गुपीत? वाचून तुम्हीही कराल स्वतःमध्ये बदल