Sunday, January 18, 2026
Home बॉलीवूड शाहरुख सुपरस्टार व्हावं हे आईचं स्वप्न होतं; आईसाठी किंग खान करू लागला होता चित्रपटांत कामे…

शाहरुख सुपरस्टार व्हावं हे आईचं स्वप्न होतं; आईसाठी किंग खान करू लागला होता चित्रपटांत कामे…

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहरुख खानची गणना जागतिक स्टार म्हणून केली जाते. गेल्या ३२ वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुख खानने जगभरात नाव कमावले आहे. एकेकाळी तो टीव्ही मालिकांमध्ये काम करत असे तर आज तो जगातील सर्वात यशस्वी आणि टॉप श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे.

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी शाहरुखने फौजी या मालिकेशिवाय इतर मालिकांमध्ये काम केले होते. त्याला फक्त छोट्या पडद्यावरच काम करायचे होते. बॉलिवूडमध्ये येण्याचा त्यांचा कोणताही विचार नव्हता. पण त्याच्या आयुष्यात एक वळण आलं की त्याने बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

शाहरुखने १९८८ मध्ये ‘फौजी’ या मालिकेत काम केले होते. यानंतर तो बॉलिवूडमध्ये आला. ही गोष्ट शाहरुखचा मित्र विवेक वासवानी याने एका मुलाखतीदरम्यान उघड केली होती. विवेकनुसार, शाहरुखने त्याची आई लतीफ फातिमा खानचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फिल्मी दुनियेत काम करायला सुरुवात केली.

विवेक वासवानी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही चर्च रोडजवळ गेहलोतकडे गेलो होतो. आम्ही बटर चिकन आणि नान ऑर्डर केले. तो  मला समोर म्हणाला, ‘माझी आई मरत आहे’. त्याने आपले हृदय माझ्यासमोर मोकळे केले. मग मरीन ड्राईव्हला जाऊन बसलो. त्याने मला त्याच्या आईचे अवयव निकामी झाल्याबद्दल सांगितले.

शाहरुख जेव्हा वाईट टप्प्यातून जात होता तेव्हा विवेकने त्याला खूप मदत केली. त्याने शाहरुखची आजारी आई लतीफसाठी औषधेही पाठवली होती. विवेक म्हणाला, ‘मी इथे मुंबईत महागडी औषधे खरेदी करायचो आणि रमन (शाहरुखचा मित्र) मार्फत दिल्लीला पाठवत असे कारण तो पायलट होता. पण त्यांचा मृत्यू झाला. १९९० मध्ये शाहरुखच्या आईचे निधन झाले.

आईच्या निधनानंतर शाहरुख मुंबईत परतला. विवेकने पुढे सांगितले की, ‘एक दिवस तो आला आणि म्हणाला, ‘मला चित्रपट करायचे आहेत.’ मी म्हणालो, ‘पण तुला चित्रपट करायचा नव्हता न, तुला फक्त टीव्ही करायचा होता.’ पण तो म्हणाला की मला हा चित्रपट हवा आहे कारण माझ्या आईचे स्वप्न आहे की मी सुपरस्टार व्हावे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

२५ तारखेला येणार गेम चेंजर विषयी मोठी अपडेट; शंकरचा सिनेमा रिलीज साठी होतोय सज्ज…

हे देखील वाचा