Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड सीए बनण्याची तयारी करणाऱ्या सिद्धांतने पहिल्या कमाईतून भावाला दिले होते हे गिफ्ट; पुढे झाला अभिनेता…

सीए बनण्याची तयारी करणाऱ्या सिद्धांतने पहिल्या कमाईतून भावाला दिले होते हे गिफ्ट; पुढे झाला अभिनेता…

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत चांगलेच नाव कमावले आहे. सिद्धांत चतुर्वेदीला पहिली ओळख रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातून मिळाली. यानंतर त्याने अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत ‘गहराईंया’ चित्रपटात काम करून चर्चेत आले.

‘गहराईं’मधील सिद्धांत आणि दीपिकाच्या इंटिमेट आणि रोमँटिक सीन्सची खूप चर्चा झाली होती. सध्या सिद्धांत ‘युद्धा’ चित्रपटात दिसत आहे. २०१९ मध्ये ‘गली बॉय’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा सिद्धांत एकेकाळी सीएचे शिक्षण घेत होता. मात्र, नंतर त्याने बॉलिवूडच्या चकचकीत जगात प्रवेश केला.

बॉलीवूड अभिनेता होण्यापूर्वी सिद्धांतने चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या दिशेने पाऊल टाकले होते. हे उल्लेखनीय आहे की सिद्धांतला त्याच्या वडिलांच्या मार्गावर चालायचे होते. वास्तविक अभिनेत्याचे वडीलही सीए आहेत. मात्र, सिद्धांतचा हा प्रवास अपूर्णच राहिला. पण अभिनेता होण्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले आणि आता तो बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे.

सिद्धांतने एका मुलाखतीदरम्यान आपल्या पहिल्या पगारातून काय केले याचा खुलासा केला होता. सिद्धांत चतुर्वेदी यांच्या म्हणण्यानुसार, ‘मी माझ्या १९ वर्षांच्या भावासाठी PS5 (प्ले स्टेशन) विकत घेतले होते.’

वडिलांच्या मार्गावर चालत सिध्दांत सीए होऊ शकला नसला तरी तो आजपर्यंत वडिलांचा एक शब्द पाळतो. त्याच्या वडिलांनी लहानपणीच सिद्धांतला समजावून सांगितले होते की, ज्या कामात त्याला रस नाही असे कोणतेही काम करू नये.

२० सप्टेंबर रोजी सिद्धांतचा ‘युद्धा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मालविका मोहनन, राघव जुयाल, राम कपूर आणि राज अर्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4.5 कोटींची कमाई केली होती. तर चित्रपटाने आतापर्यंत 7 दिवसांत 12 कोटी 30 लाखांची कमाई केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

आणखी एका सोनूने सोडले तारक मेहता; पलक सिधवानीला निर्मात्यांनी पाठवली अधिकृत नोटीस…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा