झी टॉकीजवर शेतकऱ्यांच्या लग्नाच्या समस्या, समाजाचा दृष्टिकोन, आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष यावर आधारित ‘नवरदेव BSC Agri’ हा चित्रपट थिएटरमध्ये यशस्वी प्रदर्शनानंतर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १३ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता झी टॉकीज वाहिनीवर होणार आहे. चित्रपटात शेतकरी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळवण्याकरिता येणाऱ्या अडचणींवर विनोदी आणि हृदयस्पर्शी पद्धतीने भाष्य केले आहे.
चित्रपटात क्षितीश दाते यांनी राजवर्धन नावाच्या तरुण शेतकऱ्याची भूमिका साकारली आहे. कृषी पदवीधर असूनही, समाजाच्या रूढीवादी विचारांमुळे त्याचे लग्न जुळत नाही. शिक्षणामुळे आधुनिक विचारसरणी असूनही, केवळ शेतकरी असल्यामुळे लग्नासाठी मुलगी मिळवण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागते. या संघर्षामुळे ग्रामीण प्रेक्षकांना राजवर्धनचे पात्र आपलेसे वाटते. चित्रपटाची नायिका प्रियदर्शिनी इंदुलकर सुकन्याच्या भूमिकेत दिसते, जी राजवर्धनच्या जीवनात प्रेमाचा आणि आधाराचा स्तंभ बनते. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे ग्रामीण पार्श्वभूमीतील कथेला योग्य न्याय मिळाला आहे. या जोडीला प्रेक्षकांकडून थेटर थिएटर मध्ये आजवर भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
चित्रपटातील इतर महत्त्वाच्या भूमिका मकरंद अनासपुरे, प्रविण तरडे आणि संदीप पाठक यांनी साकारल्या आहेत. विशेषतः, मकरंद अनासपुरे यांनी राजवर्धनच्या वडिलांची भूमिका साकारताना शेतकऱ्यांच्या कठीण जीवनाचा संघर्ष आणि स्वाभिमान प्रभावीपणे उभा केला आहे.
संगीताच्या बाबतीत, रॉकसन यांचं ‘लाल चिखल’ गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरलं आहे, तर दिव्य कुमार यांच्या आवाजातील ‘लढ रे तू बळीराजा’ हे गाणं शेतकऱ्यांच्या संघर्षाला आवाज देतं. या गाण्यांनी चित्रपटाच्या कथानकाला एक विशेष उंची दिली आहे.
झी टॉकीज ही मराठी चित्रपट रसिकांची आवडती वाहिनी आहे आणि नेहमीच दर्जेदार चित्रपट सादर करण्यासाठी ओळखली जाते.
‘नवरदेव BSC Agri’ हा चित्रपट ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना भावणारा आहे. हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर चुकवू नका! १३ ऑक्टोबर, रविवार रोजी दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता, फक्त झी टॉकीजवर!
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी चायनिज हॉटेलात वेटर म्हणून काम करायची सोनम कपूर; कारण जाणून आश्चर्य वाटेल…










